तिसरी कसोटी: भारताला तिसरा मोठा झटका !

पल्लेकेल: येथे सुरु असलेल्या श्रीलंका विरुद्ध भारत तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताला मोठा झटका बसला आहे. गेल्या सामन्यातील शतकवीर चेतेश्वर पुजारा ८ धावांवर बाद झाला.

पुजारा लक्षण संदकन यांच्या एका धीम्या गतीच्या चेंडूंवर स्लीपमध्ये अँजेलो मॅथ्यूजकडे झेल देऊन परतला. १८८ वर १ अशा स्थितीतून भारत ३ बाद २२९ अशा स्थितीत आहे. सध्या अजिंक्य रहाणे आणि कर्णधार विराट कोहली मैदानावर असून कोहली १० तर रहाणे ३ धावांवर खेळत आहे.