आणि ५ धावांनी हुकला कसोटी क्रिकेटमधील मोठा विक्रम

0 195

सिडनी । इंग्लंडचा स्टार खेळाडू आणि माजी कर्णधार ऍलिस्टर कुकच्या नावावर आज एक खास विक्रम केवळ ५ धावांमुळे झाला नाही. कसोटी क्रिकेटमध्ये १२ हजार धावा करणारा ६वा खेळाडू बनण्यासाठी त्याला ५ धावा कमी पडल्या. 

कूकने या सामन्यापूर्वी १५१ कसोटी सामन्यात ११९५६ धावा केल्या होत्या. त्याला १२ हजार धावांचा टप्पा पार करण्यासाठी केवळ ४४ धावांची गरज होती परंतु तो आज ३९ धावांवर बाद झाल्यामुळे त्याला या विक्रमासाठी थोडी प्रतीक्षा करावी लागेल. 

कसोटी क्रिकेटमध्ये आजपर्यंत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (१५९२१), रिकी पॉन्टिंग (१३३७८), जॅक कॅलिस (१३२८९), राहुल द्रविड (१३२८८) आणि कुमार संगकारा (१२४००) यांना १२ हजार किंवा त्यापेक्षा जास्त धावा करता आल्या आहेत. 

Comments
Loading...
%d bloggers like this: