नागपुरात सट्टा लावताना क्रिकेटबुकींना अटक

नागपुर: नागपुरातील कोंढाळी परिसरात एका अलिशान फार्म हाऊसवर १४ अॉगस्टला नागपुर पोलिसांनी अचानक धाड टाकून सध्या सुरु असलेल्या तामिळनाडू प्रिमियर लिगच्या क्रिकेट सामन्यांवरवर सट्टा लावणाऱ्या ४ लोकांना अटक केली. त्यांच्याकडून तब्बल १४ मोबाईल, लॉपटॉपसह १० लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला.

पोलिस अधिकारी पुरुषोत्तम आहेरकर यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर त्यांनी ही धडक कारवाई केली. पोलिसांनी सर्व मोबाईल, लॉपटॉप, कागदपत्र ताब्यात घेऊन तपास केल्यावर स्पष्ट झाले की तामिळनाडू प्रिमियर लिगच्या सामन्याच्या विजय आणि पराभवावर हा सट्टा लावला जात होता. पोलिसांनी विलास भिमराव मनघटे, दिपक शंकर गोस्वामी, शेख अब्बास आणि यश कन्हैयालाल आरोरा यांना अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

गेल्या अनेक दिवसापासून या फार्म हाऊस वर सट्टा लावण्याचा व्यवसाय सुरु होता अशी कबुली या आरोपींनी पोलिसांना दिली.

सचिन आमुनेकर (टीम महा स्पोर्ट्स)