कारकिर्दीतील सर्व कसोटी सामने परदेशात खेळणारा खेळाडू मायदेशात खेळतोय संघाचा १०००वा सामना

इंग्लंडचा फिरकी गोलंदाज अदिल रशिदला आज संघात स्थान देण्यात आले. त्याची १५ खेळाडूंच्या संघात पहिल्या कसोटीसाठी जेव्हा निवड झाली तेव्हा या निर्णयावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती.

१९८८ साली जन्मलेल्या रशिदने २०१५मध्ये कसोटी पदार्पण केले होते. तो डिसेंबर २०१६ला शेवटचा सामना खेळला होता.

त्यानंतर आज तो पहिल्यांदाच कसोटी सामना खेळत आहे. हा त्याचा ११वा कसोटी सामना आहे.

यापुर्वी तो जे १० सामने खेळला आहे त्यातील ५ भारतात, २ बांगलादेशमध्ये तर ३ युएईमध्ये खेळला आहे.

तब्बल १० सामन्यानंतर त्याला मायदेशात खेळण्याचे स्वप्न पुर्ण करता येणार आहे. या सामन्यात संघात स्थान दिलेला तो एकमेव पुर्णवेळ फिरकी गोलंदाज आहे. विशेष म्हणजे हा इंग्लंडचा १०००वा सामना आहे आणि अशी कामगिरी करणारा हा संघ जगातील पहिला संघ आहे.

रशिदने १० कसोटी सामन्यात आजपर्यंत ४२.७९च्या सरासरीने ३८ विकेट्स घेतल्या आहे. यातील २३ विकेट्सने त्याने भारतात घेतल्या आहेत.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

पहिल्या कसोटी सामन्यात या संघाने जिंकली नाणेफेक, अशी आहे टीम इंडिया

‘हा’ कारनामा करण्याची धमक फक्त टीम इंडियातच आहे

विराटला कसे रोखायचे हे आम्हाला चांगलेच ठाउक आहे