गुजरातमध्ये क्रिकेटपटूंना ट्रॉफी म्हणून गायी दिल्या बक्षीस

वडोदरा: एका अधिकृत नसलेल्या क्रिकेट स्पर्धेत गुजरातमध्ये विजेत्या टीममधील खेळाडूंना गायी ट्रॉफी ऐवजी बक्षीस म्हणून देण्यात आल्या. राबरी समाजाने आयोजित केलेल्या या स्पर्धेत हे वेगळं बक्षीस खेळाडूंना देण्यात आलं.

हा समाज मोठ्या प्रमाणात प्राणिमात्रांवर प्रेम करणारा समाज म्हणून ओळखला जातो. त्यामुळेच गायी वाचण्यासाठी तसेच त्यांना एक सुरक्षित वातावरण मिळण्यासाठी ही अनोखी शक्कल लढविण्यात आली.
” ह्या स्पर्धेतून आम्हाला एक संदेश द्यायचा आहे तो म्हणजे गायी हा आपल्या समाजातील एक महत्त्वाचा प्राणी आहे. राबरी समाज कायमच गायी-गुरे या प्राणीमात्रावर दया प्रेम करणारा समाज राहिला आहे.” असे यावेळी बोलताना स्पर्धेचे आयोजक प्रकाश राबरी म्हणाले.

गेल्यावर्षीपासून गायी बद्दल जनजागृती होण्यासाठी हा समाज सामनावीराला गायी हा ट्रॉफी ऐवजी पुरस्कार देत आला आहे.
खेळाडूंपैकी एक असलेले राजू राबरी म्हणाले, ” आम्हाला वाटत देशाने गायीला राष्ट्रीय घोषित करावे तरच आम्ही ह्या प्राण्याला वाचवू शकतो. सगळे खेळाडू ह्या अनोखी बक्षिसामुळे खुश आहेत. “