सचिनची खोड काढणे पडले महागात, दिले असे उत्तर!

मुंबई | आज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आपला ४५वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यामूळे जगभरातून सचिनवर शुभेच्छांचा वर्षाव होत अाहे. 

सचिनप्रमाणेच आज पंच कुमार धर्मसेना ४७वा तर आॅस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू डॅमीयन फ्लेमिंगही आपला ४८वा वाढदिवस साजरा करत आहे. 

क्रिकेट आॅस्ट्रेलियाने  डॅमीयन फ्लेमिंगला @CricketAus या ट्विटर हँडलवरून शुभेच्छा दिल्या आहेत. डॅमियन फ्लेमिंगने सचिनचा त्रिफळा उडवतानाचा खास विडियो यासाठी वापरण्यात आला आहे. 

यावर सचिन प्रेमी तसेच भारतीय चाहत्यांनी जोरदार आक्षेप घेतला. परंतू त्यांनी तो विडियो अकाऊंटवरून काढला नाही. यामुळे भारतीय चाहत्यांनी नामी शक्कल लढवत सचिनने याच फ्लेमिंगला कव्हर ड्राईव मारतानाचा खास विडियो शेअर केला. 

विशेष म्हणजे या चाहत्याच्या विडियोला ३०० पेक्षा जास्त लाईक्स आल्या आहेत. तसेच एक बर्थडे बाॅयकडून हे दुसऱ्याला गिफ्ट असल्याचेही म्हटले आहे.