ऑस्ट्रेलियाच्या माजी कर्णधाराचा विराट कोहलीला चिमटा

सध्या सर्व क्रिकेट जगतात विराट कोहली स्टीव स्मिथ आणि जो रुट यांच्यात सर्वश्रेष्ठ फलंदाज कोण यावरुन जोरदार चर्चा रंगत आहे.

यामध्ये आता ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव वॉ देखील सामील झाला आहे.

स्टीव वॉने एका कर्यक्रमात विराट कोहलीच्या फलंदाजीचे कौतूक तर केले आहे. मात्र ऑस्ट्रेलियाचा स्टीव स्मिथच विराटपेक्षा सर्वोत्तम असल्याचा चिमटा देखील काढला आहे.

“विराटकडे जगभरात कोणत्याही मैदानावर धावा करण्याची क्षमता आहे. त्याच्याकडे फलंदाजीसाठी लागणारी सर्वोत्तम कौशल्ये आहेत. जी एबी डिविलियर्स कडे होती. एबी डिविलियर्सने क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यामुळे जागात आता विराटच श्रेष्ट आहे.”

“मला वाटते की जगात स्मिथ एकमेव फलंदाज आहे, ज्याला धावांची भूक सर्वाधिक आहे. सध्या  त्याला १२ महिन्यांच्या बंदीची शिक्षा झाल्यामुळेच विराटला आयसीसी क्रमवारीत अव्वल स्थान प्राप्त करण्यात यश मिळाले आहे.” असे ऑस्ट्रेलियन माजी कर्णधार स्टीव वॉ म्हणाला.

सध्या भारत-इंग्लड यांच्या पाच कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. यात भारताला पहिल्या सामन्यात निसटता पराभव स्विकारावा लागला असला तरी, विराट कोहलीने इंग्लंड दौऱ्याला दमदार प्रारंभ करत आयसीसी क्रमवारीतील स्टीव स्मिथचे अव्वल स्थान खेचून घेतले आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाकडून खेळणाऱ्या ११ खेळाडूंची यादी सोशल माध्यमांवर लिक

-इंग्लंड विरुद्ध भारत: दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवसावर पावसाचे पाणी!