भारतीय खेळाडूंच्या बॅटमध्ये चिप !

क्रिकेट आणि टेकनॉलॉजी या दोन गोष्टी नेहमीच हातात हात धरून पुढे चालल्या आहेत. प्रेक्षकांनासाठी सामना जून जवळून पाहता यावा यासाठी आजकाल स्पायडर कॅमेरा वापरला जातो. पंचाना निर्णय घेण्यासाठी मदत करण्याकरीता होकायं आणि हॉटस्पॉट सारख्या टेकनॉलॉजी वापरण्यात येऊ लागल्या तर स्टंपमध्ये कॅमेरा, साऊंड आणि आजकाल तर एलईडी लाइट्स पण असते जेणे करून एखादा फलंदाज धावचीत झाला आहे का नाही याचा निर्णय पंचांना नीट देता यावा. आता यासर्वांच्या ही पुढे जाऊन आयसीसीने इंटेल स्पोर्ट्स ग्रुपच्या मदतीने ‘स्मार्ट बॅट’ ची संकल्पना आणली आहे.

स्मार्ट बॅट म्हणजे नक्की काय ?

स्मार्ट बॅट म्हणजे बॅटच्या दांड्याला इंटेल स्पोर्ट्स ग्रुपने बनवलेली एक चिप लावण्यात येणार आहे.

स्मार्ट बॅट काय काम करणार ?

ही बॅट वापरणाऱ्या फलंदाजांची बॅट फिरवण्याची गती, कोन आणि पद्धत या चिपमध्ये रेकॉर्ड होणार आहे.

स्मार्ट बॅटचा फायदा काय ?
स्मार्ट बॅटमुळे ती बॅट वापरणारा फलंदाज का चुकतोय आणि त्याला फॉर्ममध्ये येण्यासाठी कोणत्या गोष्टींवर भर द्यावा लागेल या प्रश्नांची उत्तरे मिळतील. चिपमधून डेटा हा कॉम्पुटरवर घेऊन त्याच विश्लेषण केलं जाईल.काही खेळाडूंच्या मते त्यांनी ही टेकनॉलॉजी यापूर्वीच सरावादरम्यान वापरली आहे.

कोणी बनवली आहे ही चिप ?

इंटेल स्पोर्ट्स ग्रुप जे की आयसीसीचे टेकनॉलॉजी पार्टनर देखील आहेत त्यांनी ही चिप बनवली आहे. इंटेल स्पोर्ट्सचे प्रमुख जेम्स कारवान हे आहेत. यापूर्वी गोल्फ आणि बेसबॉलमध्ये अशी टेकनॉलॉजी वापरली गेली आहे.

कोण वापरणार या स्मार्ट बॅट्स ?

प्रत्येक टीममधील ३ फलंदाज हि बॅट वापरणार आहेत. भारताकडून अजिंक्य राहणे, रोहित शर्मा, आणि आर. अश्विन हे या बॅट्स वापरणार आहेत.

 

तसेच यापुढे सामन्यात खेळणाऱ्या ११ खेळाडूंची नावे ही कागदावर न देता यापुढे कर्णधार ती टॅबलेटच्या माध्यमातून देईल. तसेच तो सही करून यादी ऑनलाईन सामना अधिकाऱ्यांना देईल.