पुजारा टीम इंडियात हवा की नको? सेहवागने विचारला चाहत्यांना प्रश्न

भारत-इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत पहिल्या सामन्यात फलंदाजांनी केलेल्या गचाळ कामगिरीमुळे भारत पराभूत झाला.

एजबेस्टन मैदानावर पार पडलेल्या या सामन्यात भारताने चेतेश्वर पुजाराला अंतिम ११ खेळाडूंच्या संघातून वगळले होते.

पुजाराला पहिल्या सामन्यातून वगळल्यामुळे कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवि शास्त्री यांच्या या निर्णयावर अनेकांनी प्रश्नचिन्ह उभे केले होते.

मात्र पहिल्या सामन्यात सर्वच फलंदाज अपयशी ठरल्याने पुजाराला संघातून वगळण्याचा कोहली आणि शास्त्रींचा निर्णय अयोग्य ठरला आहे.

त्यामुळे लॉर्ड्सवर ९ ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी पुजाराचा संघात समावेश करण्यासाठी संघ व्यवस्थानावर दबाव वाढला आहे.

अशात दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघात चेतेश्वर पुजारा हवा की नको असा प्रश्न भारताचा माजी उपकर्णधार विरेंद्र सेहवागने ट्विटरवरुन भारतीय चाहत्यांना विराचारला आहे.

सेहवागने विचारलेल्या या प्रश्नाला भारतीय चाहत्यांनी भरभरुन प्रतिसाद देत पुजाराला दुसऱ्या कसोटीत खेळवण्याच्या मागणीला पाठींबा दिला आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

-इंग्लंडचा माजी कर्णधार म्हणतो; जो रुट नव्हे, विराटच भारी

-वनडे-कसोटी क्रमवारीत एकाच वेळी अव्वल स्थानी विराजमान होणारे टाॅप ५ खेळाडू