फोटो अल्बम- लाॅर्ड्स कसोटीला सचिनसह भारतातील विविध क्षेत्रातील ३ दिग्गजांची हजेरी

लंडन | भारत-इंग्लंड यांच्यातील लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर गुरुवारपासून (9 ऑगस्ट) सुरु होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्याचा पहिला दिवस पावसामुळे वाया गेला.

या सामन्याच्या पहिल्या दिवसाचा खेळ झाला नसला तरी चाहते मात्र यामुळे निराश झाले नाहीत. कारण क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या लॉर्ड्सवर या सामन्याच्या पहिल्या दिवशी चाहत्यांना क्रिकेट आणि बॉलिवूडमधील दिग्गजांचे दर्शन घडले.

इंग्लंडच्या लॉर्ड्स मैदानावरील प्रत्येक क्रिकेटचा सामना सुरु होण्याआधी मैदानाच्या पॅव्हेलियनमध्ये असलेली घंटा वाजवण्याची प्रथा आहे.

या सामन्याच्या पहिल्या दिवशी घंटा वाजवण्या हा मान मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरला मिळाला होता. त्यासाठी सचिन लॉर्डवर उपस्थित होता.

तर 1983 साली भारताने लॉर्डवर जिंकलेल्या विश्वचषकावरील चित्रपटाच्या चित्रिकरणासाठी अभिनेता रणवीर सिंग आणि दिग्दर्शक कबीर खान हे सुद्धा उपस्थित होते.

त्यावेळी सचिन, रणवीर सिंग आणि कबीर खान या तीन दिग्गजांची लॉर्ड्सवर भेट झाली. या तीन दिग्गजांच्या भेटीचा क्षण अनेक क्रिकेट रसिकांसाठी पर्वणी ठरला.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

-ज्येष्ठ क्रीडा पत्रकार प्रल्हाद सावंत अनंतात विलीन

-स्म्रीती मानधनाच्या यशात कर्णधार विराट कोहलीचा मोठा वाटा