टीम इंडियासाठी खुशखबर

भारताचा यष्टीरक्षक फलंदाज  वृद्धिमान सहाच्या खांद्यावर  बुधवारी (१ ऑगस्ट) इंग्लंडमध्ये केलेली शस्त्रक्रीया यशस्वी झाली आहे.

याची माहिती बीसीसीआयने ट्विट करुन दिली आहे.

“बीसीसीआयच्या मेडिकल टीमच्या देखरेखीखाली वृद्धिमान सहाच्या खांद्यावर मॅनचेस्टरमध्ये शस्त्रक्रीया करण्यात आली आहे. तो यातून लवकरात लवकर बरा व्हावा यासाठी त्याला शुभेच्छा.” असे बीसीसीआयने आपल्या ट्विटमध्ये म्हणले आहे.

जानेवारी महिन्यात दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या कसोटी मालिकेच्या दरम्याने सहाच्या खांद्याला दुखापत झाली होती.

तसेच २०१८ च्या आयपीएल दरम्यान वृद्धिमान सहाच्या हाताच्या आंगठ्यालाही दुखापत झाली होती.

त्यानंतर बेंगलोर येथील राष्ट्रीय क्रिकेट आकादमीत पुनर्वसन कार्यक्रमात त्याच्या खांद्याची दुखापत आणखी गंभीर झाली अशी चर्चा होती. त्यामुळे बीसीसीआयने वृद्धिमान सहाच्या खांद्यावर मॅनचेस्टरमध्ये शस्त्रक्रीया करण्याचा निर्णय घेतला होता.

एमएस धोनीच्या निवृत्तीनंतर वृद्धिमान सहाने भारतीय संघात यष्टीरक्षक म्हणून समाधानकारक कामगिरी केली आहे. त्यामुळे तो २०१५ पासून भारतीय कसोटी संघाचा नियमित सदस्य आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

-पहिली कसोटी: पहिल्याच दिवशी अश्विनच्या चार विकेट; भारतीय गोलंदाज चमकले

-भारताकडून २९० खेळाडू कसोटी खेळले, परंतु अशी कामगिरी करणारा अश्विन एकटाच