या कारणामुळे कोहली-लाराशी पंगा घेणे गोलंदाजांना पडले महागात

बर्मिंगहॅम। भारत विरुद्ध इंग्लंड संघात एजबस्टन मैदानावर सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीने गुरुवारी (2 आॅगस्ट) पहिल्या डावात 149 धावांची शतकी खेळी केली आहे.

कोहलीच्या या खेळीने तो इंग्लंडमध्ये धावा करु शकत नाही असे टीका करणाऱ्यांची तोंडे बंद केली आहेत.

विराट कोहलीच्या या खेळीने ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅकग्राथ भारावून गेला आहे. चेन्नईमधील एका कार्यक्रमात ग्लेन मॅकग्राथने विराटचे कौतूक करताना, कोहली आणि विडिंजचा महान माजी फलंदाज ब्रायन लारा यांच्यातील साम्य सांगितले.

“जेव्हा एखादा गोलंदाज विराट किंवा लाराला ते लयीत असताना स्लेज करतात तेव्हा ते मोठी खेळी करतात. कालचा दिवस विराटचा होता त्यामुळे तो काल मोठी खेळी करणारच होता. विराटचा स्वभाव नैसर्गिकरीत्या आक्रमक आहे. त्यामुळे जेव्हा विराट फॉर्ममध्ये असतो तेव्हा त्यालाही स्लेजिंगच्या आव्हानांचा सामना करायला आवडते.” असे ग्लेन मॅकग्राथ म्हणाला.

सध्या ग्लेन मॅकग्राथ चेन्नईत एमआरएफ पेस फाउंडेशन गोलंदाजीची प्रशिक्षण देण्यासाठी आला.

 ग्लेन मॅकग्राॅची कारकिर्द-

४८ वर्षीय मॅकग्राॅ आॅस्ट्रेलियाकडून १२४ कसोटी सामने खेळला असून त्यात त्याने २१.६४च्या सरासरीने ५६३ विकेट्स घेतल्या आहेत. केवळ ३० कसोटी सामन्यात मॅकग्राॅने इंग्लंडविरुद्ध २०.९२च्या सरासरीने १५७ विकेट्स घेतल्या आहेत.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या-

-दिग्गज ब्रायन लाराच्या विश्वविक्रमाला विराट कोहलीकडून धक्का

-यापूर्वी जगातील कोणत्याच क्रिकेट संघाच्या कर्णधाराने असा निर्णय घेतला नसेल