हा खेळाडू म्हणतो सचिन विराटपेक्षा भारी

ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मायकल कास्प्रोवीच एका ‘इंडो-ऑस्ट्रेलियन’ इव्हेंटमध्ये भाग घेण्यासाठी दिल्लीमध्ये आले होते. तेव्हा त्यांना प्रश्न विचारण्यात आला की तुमच्या कारकिर्दीतील कोणत्या फलंदाजाला तुम्ही सर्वात धोकादायक मानता? तर त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता सचिन तेंडुलकर हे नाव घेतलं.

ते म्हणतात की सचिन वेगळा आणि सर्वात उत्कृष्ट आहे. ते hindi.news18.com शी बोलताना सांगत होते. तसेच ते सचिन आणि विराट यांच्यात केल्या जाणाऱ्या तुलनेबद्दल म्हणाले की मी कधी विराट बरोबर खेळलो नाही पण सचिन त्याच्यापेक्षा खूप चांगला आहे. मी आत्तापर्यंत ज्यांना गोलंदाजी केली आहे त्यांच्यापैकी सचिन शानदार फलंदाज होता आणि त्याच्या इतका आतमविश्वास असणारा मी कोणाला बघितलं नाही.

सचिनला खूप चांगला माहित असायचं की कोणत्या गोलंदाजाला कसं डॉमिनेट करायचं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सचिन जेवढा भारतात चांगला खेळाला तेवढाच तो भारताबाहेरही चांगला खेळाला. निर्भर आणि निडर राहून खेळाला. माझ्या मते सचिनच्या तुलनेत विराटला गोलंदाजी करणे जास्त सोपी असेल.

३८ कसोटी सामन्यात ११३ बळी घेणाऱ्या या ऑसी गोलंदाजाने सचिनला ९ कसोटी सामन्यात फक्त २ वेळा बाद केले आहे तर ९ वनडे सामन्यातही २ वेळा बाद केले आहे.

मायकल कास्प्रोवीच भुवनेश्वर कुमार व जसप्रीत बुमराहबद्दल बोलताना म्हणाले की भारतात असे गोलंदाज असणे चांगली गोष्ट आहे. मी त्यांना जास्त बघितलं नाही पण ते खूप चांगलं खेळत आहेत. ऑस्ट्रलियामध्ये वेगवान गोलंदाजांना खूप प्रशिक्षण दिले जाते. भारतात असं नाही. म्हणूनच कदाचित ते जास्त प्रभावी होत असावेत

त्याच बरोबर ते म्हणाले की वेगवान गोलंदाजी ही नैसर्गिक आहे. वेगवान गोलंदाज होणं आणि वेगाने बॉल फेकणे ह्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. प्रशिक्षक वेगवान गोलंदाज बनवू शकतो पण वेगाने बॉल फेकणे नाही शिकऊ शकत. म्हणून वेगवान गोलंदाजी ही नैसर्गिक असते.