टीम इंडियावर चिडले चाहते, असा केला राग व्यक्त

सिडनी। भारताचा उद्यापासून ऑस्ट्रेलिया विरुद्ध चौथा आणि शेवटचा कसोटी सामना सुरु होणार आहे. हा सामना सिडनी क्रिकेट ग्राउंडवर पार पडणार आहे. या सामन्यासाठी आज बीसीसीआयने 13 जणांचा संघ घोषित केला आहे.

या 13 जणांच्या संघात भारताचा सलामीवीर फलंदाज केएल राहुलचाही समावेश करण्यात आला आहे. पण ही गोष्ट चाहत्यांच्या पचनी पडलेली नाही. कारण केएल राहुल मागील अनेक सामन्यांपासून धावा करण्यासाठी झगडत आहे.

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या चालू मालिकेत त्याने पहिल्या दोन सामन्यातील चार डावात मिळून 48 धावा केल्या आहेत. त्यामुळे त्याला मेलबर्न येथे झालेल्या तिसऱ्या सामन्यासाठी वगळण्यात आले होते. त्याच्याबरोबरच खराब फॉर्ममध्ये असणाऱ्या मुरली विजयलाही वगळण्यात आले होते.

या दोघांऐवजी मयंक अगरवाल आणि हनुमा विहारीने मेलबर्न कसोटीत सलामीला फलंदाजी केली होती. विहारी आणि अगरवालने या कसोटीत दोन्ही डावात चांगली फलंदाजी केली होती. अगवालने तर पहिल्या डावात अर्धशतकही केले होते.

त्यामुळे केएल राहुलला सिडनी कसोटीसाठी भारतीय संघात स्थान देण्याच्या निर्णयावर चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

सिडनी कसोटीसाठी घोषित करण्यात आलेल्या 13 जणांच्या संघात आर अश्विनचा समावेश करण्यात आला असला तरी तोही पुर्णपणे तंदुरुस्त नसल्याने त्यालाही सिडनी कसोटीत बाहेर बसावे लागण्याची दाट शक्यता आहे.

तो पर्थ आणि मेलबर्न कसोटीतूनही पोटाच्या स्नायूंच्या दुखापतीमुळे भारतीय संघातून बाहेर होता. पर्थ कसोटीत त्याच्या ऐवजी हनुमा विहारी तर मेलबर्न कसोटीत रविंद्र जडेजा खेळला.

याबरोबरच दुखापतीमुळे इशांत शर्माही सिडनी कसोटीतून बाहेर पडला आहे. तर रोहित शर्मा सिडनी कसोटीपुर्वीच भारतात परतला आहे. रोहित शर्माला कन्यारत्न प्राप्त झाले असल्यामुळे तो या सामन्यात खेळणार नाही.

असा आहे 13 सदस्यांचा भारतीय संघ- 

विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), केएल राहुल, मयांक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत, कुलदीप यादव, रविंद्र जडेजा, आर अश्विन, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, उमेश यादव.

महत्त्वाच्या बातम्या:

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आयपीएलमधून बाहेर?

या कारणामुळे इशांत शर्मा सिडनी कसोटीतून बाहेर

असे आहे टीम इंडियाचे २०१९ चे संपुर्ण वेळापत्रक