जखमी शोएब मलिकची विचारपूस करणाऱ्या शिखर धवनवर भडकले चाहते

मुंबई । भारतीय संघाचा सलामीवीर शिखर धवनने परवा पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलँड सामन्यादरम्यान जखमी झालेल्या शोएब मलिकची ट्विटरवर विचारपूस केली. ही गोष्ट मात्र अनेक भारतीय क्रिकेटप्रेमींना पटलेली नाही.

शिखर धवनने ट्विटमध्ये म्हटले आहे, ” जनाब, तू अपघातातून सावरत असशील. तू लवकरच मैदानावर परत यावे. काळजी घे. “

शिखर धवनचा हा ट्विट मात्र चांगलेच महागात पडले आहे. त्याचे याबद्दल जेवढे कौतुक केले गेले तेवढ्याच चाहत्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले.