जाणून घ्या ११९२ सालापासून क्षेत्ररक्षणात झालेले मोठे बदल

 

१९९२ बेन्सन आणि हेगेस विश्वचषकात पहिल्यादा क्रिकेट खेळताना खेळाडूंनी रंगीत कपड्याचा वापर केला होता. तसेच पहिल्यांदाच वनडे क्रिकेटमध्ये पांढरा चेंडू वापरण्यात आला होता. या विश्वचषकातच पहिल्यांदा डे नाइट सामने खेळवण्यात आले होते. तेव्हा पासून आयसीसीने नेहमीच वनडे क्रिकेटच्या नियमांमध्ये बद्दल केले आहेत. चला तर मग पाहुयात काय आहेत हे बद्दल !

क्षेत्ररक्षण आणि पॉवर प्ले

११९२ – पहिल्या १५ षटकात फक्त दोन खेळाडू वर्तुळाच्या बाहेर ठेवण्याची परवानगी होती. त्यानंतरच्या षटकांसाठी ५ खेळाडू वर्तुळ बाहेर ठेवता येउ शकत होते.

यामुळेच पहिल्या १५ षटकांमध्ये फलंदाज जास्तीत जास्त आक्रमक होण्याचा ट्रेंड चालू झाला. याची सुरुवात ११९६च्या विश्वचषक स्पर्धेत सनथ जयसुर्या आणि रोमेश कलुविथराणा या श्रीलंकेच्या सलामीच्या जोडीने केली.

२००५ – पॉवर प्ले नावाची संकल्पना पुढे आली. ज्यात पहिल्या १० षटकात फक्त २ खेळाडू वर्तुळाच्या बाहेर ठेवण्याची परवानगी असायची, त्यानंतर प्रत्येकी ५-५ षटकांचे पॉवर प्ले गोलंदाजी करणारा संघ घायचा. त्यात फक्त ३ खेळाडू वर्तुळ बाहेर असायचे.

२००८ – पहिल्या १० षटकांच्या पॉवर प्ले नंतरच्या २ पॉवर प्लेला नाव देण्यात आले बॅटिंग पॉवर प्ले आणि बॉलिंग पॉवर प्ले. बॅटिंग पॉवर प्ले फलंदाजीचा संघ त्याना हवा तेव्हा घेऊ शकला होता तर बॉलिंग पॉवर प्ले क्षेत्ररक्षण करणारा संघ त्यांना हवा तेव्हा घेत असे.

२०११ – आयसीसीने नियम बदलले आणि ठरवले की ४१वे षटक चालू होण्याच्या आधीच दोनीही संघानी आपले आपले पॉवर प्ले घेणे अनिवार्य आहे. बाकी षटकांमध्ये ५ खेळाडू वर्तुळाच्या बाहेर थांबू शकत होते.

२०१२ – पॉवर प्ले षटकांच्या व्यतिरिक्त ४ खेळाडू वर्तुळ बाहेर थांबू शकत होते. ३ पॉवर प्लेच्या ऐवजी २ पॉवर प्ले करण्यात आले होते.

२०१५ – ५ खेळाडू ४१ ते ५० षटकांपर्यंत वर्तुळ बाहेर राहू शकतात. तसेच फलंदाजी पॉवर प्ले ही काढून टाकण्यात आला.

२०१७ – आता ४१ ते ५० षटकांदरम्यान ४ खेळाडू आणि १ ते १० षटकां दरम्यान २ खेळाडू वर्तुळ बाहेर राहू शकतात.