मैथ्यू हेडनचा सर्फिंग करताना गंभीर अपघात

क्वीन्सलॅंड येथे सुट्टी साजरी करायला गेलेला ऑस्ट्रेलियाचा महान खेळाडू मैथ्यू हेडन एका गंभीर अपघातातून बचावला आहे. या अपघातात हेडनच्या डोक्याला, मानेला आणि मणक्याला दुखापत झाली आहे.

ऑस्ट्रेलियाच्या या माजी सलामीवीराला मानेखाली मणक्याला गंभीर दुखापत झाली आहे. हेडन नाॅर्थ स्टार्डब्रोक आयलंड, क्वीन्सलँड येथे मुलगा जोश सोबत फिरायला गेलेला असताना ही दुखापत झाली.

इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्ट मध्ये हेडनने म्हटले आहे. ”सी-6 लिगामेंट फ्रॅक्चर आहे. सी-4 आणि सी-5 लिगामेंटस फाटलेले आहे. मी एका मोठ्या संकटातून वाचलो आहे”. प्रकृती सुधारत असल्याचेही त्याने सांगितले आहे. त्यानंतर हेडनने त्याचे सहकारी मित्र बेन आणि सुई केली यांनी केलेल्या जलद उपचाराबद्दल आभार मानले आहेत.

क्वीन्सलँडमध्ये झालेला हा हेडनचा पहिला अपघात नाही. यापूर्वी 1999 साली नाॅर्थ स्टार्डब्रोक आयलंड इथेच त्याची बोट उलटली आणि आपला जीव वाचवण्यासाठी त्याने तब्बल एक किलोमीटर अंतर पोहून किनारी परतला. त्यावेळी त्याच्या सोबत ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू एंड्र साइमंड्स देखील होता.

मैथ्यू हेडनने 2009 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. हेडनने 103 कसोटी आणि 161 वन-डे सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. सध्या हेडन आंतरराष्ट्रीय स्तरावरील सामन्यात समालोचकाची भूमिका निभावताना दिसतो.

महत्वाच्या बातम्या-