कर्णधार कोहलीला ट्रोल करणे आयसीसीच्या चांगलेच अंगलट

एजबस्टन मैदानावर पार पडलेल्या इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीने जो रुटला इंग्लंडच्या पहिल्या डावात धावबाद केल्यानंतर बॅट ड्रॉपसारखे हावभाव करत माइक ड्रॉप सेलिब्रेशन केले होते.

त्यानंतर आयसीसीनेही विराटला या प्रकरणावरुन शनिवारी (४ ऑगस्ट) ट्रोल केले होते.

आयसीसीने ट्विटरवर एक फोटो शेअर केला होता. ज्यात विराट आणि रुट संभाषण करत आहेत आणि रुटच्या हातातून माइक खाली पडत आहे.

तसेच आयसीसीने या फोटोला ‘रुट आऊट’ असे कॅप्शन दिले होते.

भारताचा कर्णधार विराट कोहलीला ट्रोल करने मात्र आयसीसीच्या चांगलेच अंगलट आले आहे.

आसीसीच्या या ट्विटनंतर भडकलेल्या भारतीय चाहत्यांनी आयसीसीला ट्विटरवर चांगलेच धारेवर धरत खरडपट्टी केली.

तसेच भारतीय चाहत्यांनी आयसीसीच्या ट्विटवर नाराजी व्यक्त करत आयसीसीकडून या प्रकारची अपेक्षा नाही असे मत व्यक्त केले आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

-मयांक अगरवाल, पृथ्वी शाॅच्या फटाकेबाजी समोर दक्षिण आफ्रिका अ उध्वस्त

-सौरव गांगुली म्हणतो, इंग्लंड जिंकायचे असेल तर हे करु नका