भारतीय महिला क्रिकेट संघाला टी-20 विश्वचषकापुर्वी मोठा धक्का

टी-20 विश्वचषकाला अवघे पाच महिने बाकी असताना भारतीय महिला क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे.

भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक तुषार आरोटेंनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे.

नुकत्याच पार पडलेल्या एशिया चषकात भारताचा पराभव झाला होता. या पराभवानंतर संघातील वरिष्ठ खेळाडू आणि प्रशिक्षक तुषार आरोटे यांच्यातील वाद समोर आला होता.

तुषार आरोटेंनी बीसीसीआयला लिहलेल्या पत्रात हा राजीनामा वैयक्तिक कारणांमुळे दिला असे लिहले आहे. मात्र आरोटेंनी हा राजीनामा खेळाडूंबरोबरच्या वादामुळे दिला आहे हे जाहीर आहे.

तुषार आरोटेंनी 2017 साली भारतीय महिला संघाच्या प्रशिक्षक पदाची सुत्रे हाती घेतली होती. त्यांच्या कारकिर्दीत भारतीय महिला संघाने 2017 च्या एकदिवसीय विेश्वचषकाचे उपविजेतेपद मिळवले होते. तसेच नुकत्याच झालेल्या एशिया चषकातील अंतिम सामन्यात भारतीय संघाला बांगलादेशने पराभूत केले होते.

महत्त्वाच्या बातम्या-

-टीम इंडिया अव्वल स्थान पुन्हा मिळविण्याचे समीकरण?

-तो गोलंदाज म्हणतो, विराटला दौरा गाजवणे तर सोडा एक शतकही करु देणार नाही