टीम इंडिया अव्वल स्थान पुन्हा मिळविण्याचे समीकरण?

भारतीय क्रिकेट संघ गुरवारपासून (१२ जुलै) इंग्लंड विरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे.

आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत भारत सध्या दुसऱ्या स्थानी आहे. भारतीय संघाला पुन्हा एकदा एकदिवसीय क्रमवारीत अव्वल स्थानी विराजमान होण्याची संधी या मालिकेत असणार आहे.

मे महिन्यात इंग्लंडने भारताला एकदिवसीय क्रमवारीतून खाली खेचत अव्वल स्थान मिळवले होते.

सध्या एकदिवसीय क्रमवारीत १२६ रेटिंग्ससह इंग्लंड अव्वल स्थानी आहे. तर भारतीय संघ १२२ रेटिंग्ससह दुसऱ्या स्थानी आहे.

इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत भारताने ३-० असा पराभव केल्यास भारताला १० रेटिंग्सचा लाभ होऊन भारतीय संघाचे रेटिंग्स १३२ होणार आहेत.

तसेच इंग्लंडने जर भारताचा ३-० ने पराभव केला तर त्यांनाही १० रेटिंग्सचा फायदा होऊन अव्वल स्थान कायम राखता येणार आहे.

भारताने नुकतेच इंग्लंडला तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेत २-१ ने पराभूत केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-लॉर्ड्सवरील ‘त्या’ सेलिब्रेशनची सौरव गांगुलीला नासीर हुसेनने करुन दिली आठवण

-लिटिल मास्टर गावस्करांचे चालू सामन्यात चक्क अंपायरने कापले होते केस!