पहा वार्नरचा हा विडीओ- सगळंच हिरावलं; तरीही क्रिकेटचं पहिलं प्रेम

मुंबई | आॅस्ट्रेलियाचा माजी उपकर्णधार डेविड वार्नरचा सध्या एक फोटो सोशल माध्यंमांवर जोरदार व्हायरल होत आहे. त्यात तो सिडनी शहरातील रोडवरून जात असून हातात बॅट नसतानाही फलंदाजीची अॅक्शन करत आहे. 

आॅस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेदरम्यान चेंडू छेडछाड प्रकरणी आॅस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव स्मिथ, उपकर्णधार डेविड वार्नर यांच्यावर एक वर्षाची तर बॅनक्राॅफ्टवर ९ महिन्यांची बंदी घालण्यात आली आहे. त्यात यापुढे डेविड वार्नर आॅस्ट्रेलिया संघाचा कधीही कर्णधार होऊ शकत नाही असेही स्पष्ट करण्यात आले होते. 

त्यामूळे एकवेळ क्रिकेटमध्ये एक सलामीवीर म्हणून राज्य करणारा हा खेळाडू सध्या क्रिकेटपासून दूर आहे. त्यांना आंतरराष्ट्रीय तसेच देशांतर्गत क्रिकेट खेळायला बंदी घालण्यात आली आहे. आपल्यातील क्रिकेट जिंवत ठेवण्यासाठी ते केवळ क्लब क्रिकेट खेळू शकतात. 

असे असताना काल स्वत:च्या घराचे बांधकाम करत असलेला वार्नरचा एक फोटो सोशल माध्यंमांवर व्हायरल झाला होता तर आज तो सिडनीमधील एका रस्त्यावरून जात असतानाचा दुसरा फोटो व्हायरल होत आहे. 

हा फोटो नक्की कधीचा आहे याबद्दल जरी शंका असली तरी क्रिकेटप्रेमींनी मात्र याबद्दल सोशल माध्यंमांवर हळहळ व्यक्त केली आहे. 

Video-