विराट कोहलीचे भारतीय चाहत्यांना भावनिक अावाहन

लंडन | टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने, चाहत्यांनी भारतीय संघातील एक किंवा दोन खेळाडूंना नव्हे तर संपूर्ण संघाला पाठींबा देण्याचे अावाहन केले आहे.

बुधवारी (८ ऑगस्ट) भारतीय संघाला इंग्लंडमधील भारताचे उच्च आयुक्त वायके सिंन्हा यांनी त्यांच्या निवासस्थानी भोजनासाठी निमंत्रीत केले होते.

“आम्ही सर्व खेळाडू एक संघ म्हणून खेळतो. माझे चाहत्यांना अावाहन आहे की, तुम्ही भारतीय संघातील एक किंवा दोन खेळाडूंना नव्हे तर संपूर्ण संघाला प्रोत्साहित करावे. आम्ही एक संघ म्हणून प्रत्येक वेळी एकत्रीतपणे भारताला विजय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत असतो.” असे कोहली यावेळी चाहत्यांना अावाहन करताना म्हणाला.

भारत आणि इंग्लंड यांच्यात गुरुवारपासून (९ ऑगस्ट) लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना होणार आहे.

एजबस्टन येथील पहिल्या सामन्यात इंग्लंडने भारतावर ३१ धावांनी विजय मिळवत या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

टाॅप ३- या भारतीय खेळाडूंचा २०१९चा विश्वचषक ठरणार शेवटचा!

-पहिल्यांदा विश्वचषक जिंकल्यावर करुणानिधींनी चेस सेट भेट दिला होता- विश्वनाथन आनंद