टाॅप ३- धोनी, सचिन नाही तर या ३ कर्णधारांनी जिंकल्या आहेत इंग्लंडमध्ये कसोटी मालिका

जुलै महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर जात असलेली टिम इंडिया 1 अॉगस्ट ते 11 सप्टेंबर या दरम्यान पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. या इंग्लंड दौऱ्यात भारतीय संघ कसोटी मालिकेसह तीन एकदिवसीय आणि तीन टी-20 सामन्यांची मालिकादेखील खेळणार आहे.

पण साऱ्या क्रिकेट विश्वाचे विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली इंग्लड दौरा करणाऱ्या भारतीय संघाची कसोटी मालिकेत कशी कामगिरी होतेय याकडे लक्ष लागून राहिले आहे.

भारतीय संघाने इंग्लडच्या भूमीवर आजपर्यंत सर्वोत्कृष्ट कामगिरी केली नसली तरी बऱ्यापैकी चांगली कामगिरी मात्र नक्कीच केली आहे.

या लेखात तीन भारतीय कर्णधार ज्यांच्या कार्यकाळात भारतीय संघ इंग्लंडमध्ये कसोटी मालिका हरला नाही याचा धावता आढावा घेणार आहोत.

कपिद देव

कपिल देव यांना भारताचे सर्वकालिन महान अष्टपैलू क्रिकेटपटू म्हणून ओळखले जाते. ज्यांच्या नेतृत्वाखाली 1983 साली जायंट किलर ठरत भारतीय संघाने एकदिवसीय विश्वचषकावर आपलं नाव कोरले होते.

कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारताने 1986 मध्ये इंग्लंडला पराभूत करत तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-0 अशा फरकाने विजय मिळवला होता.

अजित वाडेकर यांच्यानंतर इंग्लंडच्या भूमिवर कसोटी मालिका जिंकणारे ते दुसरे कर्णधार बनले होते.

कपिल देव यांनी 1983 ते 1987 या काळात 34 कसोटी सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व केले. यामध्ये भारतीय संघाने 4 सामन्यात विजय मिळवला तर 7 सामन्यात भारत पराभूत झाला. 23 सामने अनिर्णित राहिले.

सौरव गांगुली 

भारतीय क्रिकेट संघाला 2000 च्या दशकात नवी ओळख मिळवून देणाऱ्या सौरव गांगुलीला भारतीय कर्णधारांपैकी एक यशस्वी कर्णधार मानले जाते. 2002 साली सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाने एकदिवसीय नेटवेस्ट मालिका जिंकत तीन सामन्यांची कसोटी मालिका 1-1 अशी बरोबरीत सोडवली होती.

सौरव गांगूलीने 49 कसोटी सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे. त्यामध्ये 21 विजय आणि 13 पराभव भारतीय संघाच्या वाट्याला आले. यामध्ये 13 सामने अनिर्नित राहिले.

राहुल द्रविड़ 

सौरव गांगुली आणि ग्रेग चॅपेल यांच्या वादानंतर भारतीय संघाचे कर्णधारपद राहुल द्रवि़डकडे आले. 2007 साली भारतीय संघाच्या इंग्लंड दौऱ्यात भारताने तीन कसोटी सामन्यांची मालिका 1-0 अशा फरकाने जिंकली.

कर्णधार म्हणून द्रविडची कारकिर्द छोटी होती. यामध्ये  कर्णधार म्हणून खेळलेल्या 25 सामन्यात भारताच्या पदरी 8 विजय आणि 6 पराभव आले. तर 11 सामने अनिर्णित राहिले होते.

महत्त्वाच्या बातम्या:

फिफा विश्वचषक: एकाच सामन्यात चक्क 12 गोल

फिफा विश्वचषक 2018: तिकीट खरेदीमध्ये भारत तिसऱ्या क्रमांकावर