उपकर्णधार या नात्याने रहाणेची काहीच जबाबदारी नाही का?

भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेची भारताबाहेरील कामगिरी वाखानण्याजोगी आहे. खास करुन २०१४ सालच्या भारताच्या इंग्लंड दौऱ्यात रहाणेची कामगिरी चांगली झाली होती.

या दौऱ्यात भारताने लार्ड्सवर झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात अजिंक्य रहाणेचे शतक आणि इशांत शर्माने दुसऱ्या डावात घेतलेल्या ७ विकेटच्या जोरावर पाच सामन्यांच्या मालिकेत एकमेव कसोटी सामना जिंकला होता.

या दौऱ्यात अजिंक्य रहाणेने ५ सामन्यात २९९ धावा केल्या होत्या.

त्यानंतर राहणेने न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियातही चमकदार कामगिरी केली होती.

मात्र गेल्या एक वर्षापासून रहाणची कसोटी क्रिकेटमधील कामगिरी खालावली आहे.

या वर्षाच्या सुरवातीला जानेवरीमध्ये दक्षिण आफ्रिकेत झालेल्या कसोटी मालिकेत खराब फॉर्ममुळे रहाणेला एकमेव तिसऱ्या सामन्यात संधी देण्यात आली होती.

त्यामध्ये रहाणेला पहिल्या डावात ९ तर दुसऱ्या डावात ४८ धावा करता आल्या.

इंग्लंड विरुद्ध सुरु झालेल्या कसोटी मालिकेतील एजबस्टन मैदानावर पार पडलेल्या पहिल्या कसोटीत रहाणेला पहिल्या डावात १५ तर दुसऱ्या डावात फक्त दोन धावा करता आल्या.

या सामन्यात भारताकडून विराट कोहली वगळता एकाही फलंदाजाला इंग्लिश गोलंदाजांचा सामना करता आला नाही.

गोलंदाजांनी केलेल्या दमदार कामगिरीमुळे भारताचे या सामन्यातील आव्हान जिवंत होते. मात्र फलंदाजांच्या हाराकीरीमुळे भारत ३१ धावांनी पराभूत झाला.

इंग्लंड विरुद्धच्या उर्वरित मालिकेत जर भारताला यश मिळवायचे असेल तर कर्णधार विराट कोहलीला अजिंक्य रहाणे आणि इतर फलंदाजांची साथ मिळणे आवश्यक आहे.

यामध्ये उपकर्णधार या नात्याने अजिंक्य रहाणेने जबाबारीने फलंदाजी केली पाहिजे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

-इंग्लंडच्या दिग्गज महिला क्रिकेटपटूबरोबर अर्जुन तेंडुलकरचे खास डीनर

-रोहित शर्मा म्हणतो, कुलदीप तू इंग्लंडमध्ये फक्त फोटोच काढ!