सौरव गांगुली म्हणतो, हे केल्यास आर अश्विनची ताकद आणखी वाढणार

भारत-इंग्लंड यांच्यात गुरुवारपासून (९ ऑगस्टपासून) लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर दुसरा कसोटी सामना सुरु होत आहे.

पहिल्या कसोटीमध्ये भारतीय गोलंदाजांनी जबरदस्त कामगिरी करुनही फलंदाजांच्या अपयशामुळे भारताला ३१ धावांनी निसटता पराभव स्विकारावा लागला होता.

यामध्ये फिरकीपटू आर अश्विनने विशेष कामगिरी केली होती.

आज सुरु होणाऱ्या दुसऱ्या सामन्यात जर आर अश्विनची कामगिरी प्रभावी व्हायची असेल तर त्याच्या जोडीला अंतिम ११ खेळाडूंच्या संघात कुलदीप यादवचाही समावेश करवा असे मत सौरव गांगुलीने व्यक्त केले आहे.

“पहिल्या सामन्यात अश्विनने सर्वोत्तम कामगिरी केली. मला वाटते की इंग्लंडमधील उष्ण वातावरण पहाता लॉर्ड्सवर फिरकी गोलंदाजांना नक्की मदत मिळेल. अशात दुसऱ्या सामन्यासाठी कुलदीपला संघात समाविष्ट केल्यास अश्विनचा भार हलका होईल.” असे गांगुली म्हणाला.

विराट कोहलीने एजबस्टन मैदानावर झालेल्या सामन्यातील पहिल्या डावात १४९ धावा तर दुसऱ्या डावात ५१ धावा केल्या होत्या. पहिल्या सामन्यात विराटने केलेल्या कामगिरीबद्दल गांगुलीने समाधान व्यक्त कले. 

“विराटने पहिल्या सामन्यातील कामगिरीने दाखवून दिले की, चांगली कामगिरी करण्यासाठी तो कायम आतुर असतो. तसेच त्याच्याकडे फटक्यांची निवड आणि परिस्थितीनुसार खेळात बदल करण्याचे कौशल्या असल्यामुळे तो असामान्य क्रिकेटपटू आहे.” असे मत गांगुलीने पुढे व्यक्त केले.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

-आयसीसीने घेतला महत्त्वाचा निर्णय, टी-२० क्रिकेट येणार धोक्यात!

-विराट सोबतचा फोटो शेअर करत पाकिस्तानी गोलंदाजाने स्वत:लाच केले ट्रोल