हे दोन सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूंमधील युद्ध आहे

भारताचा कर्णधार विराट कोहली आणि इंग्लंडचा गोलंदाज जेम्स यांच्यातील एकमेकांना वरचढ होण्याची स्पर्धा जगप्रसिद्ध आहे. हे दोन्हीही खेळाडू तोडीस तोड आहेत.

अँडरसन कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थानी आहे. तर  विराट कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत नुकताच अव्वल स्थानी विराजमान झाला आहे.

विराट कोहली फलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थानी विराजमान झाल्यानंतर, अँडरसनने त्याचे अभिनंदन करत कौतूक  केले आहे.

“माझ्यात आणि विराटमध्ये मैदानावर जरी जोरदार टक्कर होत असली तरी आम्हा दोघांना एकमेकांबद्दल आदर आहे. पहिल्या कसोटी सामन्यातील कामगिरीनंतर विराट फलंदाजी क्रमवारी अव्वल स्थानी पोहलचा आहे. तर गोलंदाजी क्रमवारीत मी अव्वल स्थानी आहे. मला वाटते हे दोन सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूंमधील युद्ध आहे. मला एजबस्टनवर त्याच्याशी लढायला मजा आली.” असे जेम्स अॅंडरसन म्हणाला.

यावेळी पत्रकारांशी बोलताना अॅंडसनने विराट कोहलीने २०१४ च्या इंग्लंड दौऱ्यातील खराब कामगिरी विसरत, या दौऱ्याची एजबस्टनपासून चांगली सुरवात केली त्याबद्दल कौतूक देखील केले.

“पहिल्या कसोटी सामन्यात विराटने दबावात केलेल्या १४९ धावा भारतासाठी महत्त्वाच्या ठरल्या. मला त्याची चांगली कामगिरी करण्याची जिद्द आवडली. मी सुद्धा त्याला या सामन्यात टक्कर दिली मात्र यात तो थोडासा वरचढ ठरला.” या शब्दात विराटबद्दल अँडरसनने भावना व्यक्त केल्या.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

-माजी कर्णधार म्हणतो, हे केल्याशिवाय चहलला कसोटी संघात स्थान नाही

-मोहम्मद सिराजच्या दहा बळींनी उडवली दक्षिण आफ्रिकेची धुळधान