विराट कोहलीचे टेन्शन वाढले, चांगली कामगिरी केली नाही तर…

आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यानंतर आयसीसीने कसोटी क्रमवारी जाहिर केली. यामध्ये फलंदाजाच्या यादीत भारताचा कर्णधार विराट कोहली पहिल्या स्थानावर कायम आहे.

पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील मालिकाविजयानंतर न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसनने 913 गुणांसह विराटनंतर दुसरे स्थान मिळवले आहे. तो 900 पेक्षा जास्त गुण मिळवणारा न्यूझीलंडचा पहिला फलंदाज ठरला आहे.

या यादीत विराटचे 920 गुण असून तो फक्त 7 गुणांनी विलियमसनच्या पुढे आहे. जर विराटला कसोटी स्थानावर अव्वल राहायचे असेल तर त्याला ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तीनही कसोटी सामन्यात चांगली फलंदाजी करावी लागेल.

सोमवारी अॅडलेड ओव्हल मैदानावर आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत पहिला कसोटी सामना पार पडला. या सामन्यात भारताने 31 धावांनी विजय मिळवत चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यात विराटने 3 आणि 34 धावा केल्या आहेत.

केनने पाकिस्तान विरुद्ध तिसऱ्या कसोटी सामन्यात 89 आणि 139 धावा केल्या होत्या. विराटने कसोटी सामन्यात धावा करण्यात अपयशी ठरला तर केन या आठवड्यात पहिल्या क्रमांकावर येऊ शकतो.

या क्रमवारीत फलंदाजीमध्ये चेतेश्वर पुजाराने पहिल्या पाच फलंदाजांमध्ये स्थान मिळवले आहे. तो आता या क्रमावारीमध्ये चौथ्या क्रमांकावर आला आहे. त्याने अॅडलेड कसोटीमध्ये पहिल्या डावात 123 आणि दुसऱ्या डावात 71 धावांची खेळी केली होती.

महत्त्वाच्या बातम्या:

धोनी, गांगुलीप्रमाणे किंग कोहलीच्या नावावरही झाला नकोसा विक्रम

आयपीएलमध्ये हे ३ खेळाडू खेळणार किंग्ज ११ पंजाबकडून

सर जडेजाचा १५ खेळाडूंमध्ये एकही बेस्ट फ्रेंड नाही तर…