एमएस धोनी म्हणतो, 300 एकदिवसीय सामने खेळलोय; मी वेडा आहे का?

कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल या भारतीय फिरकी जोडीने गेल्या वर्षभरात जगभरातील भल्या भल्या फलंदाजांना घाम फोडला आहे.

मार्चमध्ये दक्षिण अफ्रिकेत आणि आता इंग्लंडमध्ये धुमाकूळ घालत असलेली कुलदीप-चहल जोडी भारताच्या एकदिवसीय आणि टि-20 संघाच्या गोलंदाजीचा कणा बनली आहेत.

कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल ही फिरकी जोडी नुकतेच ‘व्हाट द डक’ या कार्यक्रमात आली होती.

कुलदीप आणि चहलने या कार्यक्रमात त्यांच्या क्रिकेटच्या संबंधीत अनेक आठवणी आणि किस्से सांगितले.

कुलदीप यादववर एमएस धोनी एकदा खूप चिडला होता. त्या संबंधीचा किस्सा कुलदीपने या कार्यक्रमात सांगितला.

“गेल्या वर्षी डिसेंबर मध्ये आम्ही श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय सामना खेळत होतो. त्यावेळी माझी गोलंदाजी चांगली होत नव्हती आणि बळी ही मिळत नव्हते. त्यामुळे मला धोनीने क्षेत्ररक्षणात थोडे बदल करायला सांगितले होते. त्यावर मी धोनीला नकार दिला होत्या. तेव्हा धोनी माझ्यावर खूप चिडला. मी वेडा आहे म्हणुन 300 एकदिवसीय सामने खेळलो आहे का? असे तो मला म्हणाला होता”. असे कुलदीपने सांगितले.

कुलदीप आणि चहलच्या गोलंदाजीतील यशात धोनीचा ही मोठा वाटा आहे. कित्येक वेळी धोनी या फिरकी जोडीला यष्टीरक्षण करताना मोलाचे सल्ले देतो.

या ऑनलाइन कार्यक्रमात कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहलने त्यांच्या मैदानाबरोबर मैदानाबाहेरही अनेक किस्से त्यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या-

-तो गोलंदाज म्हणतो, विराटला दौरा गाजवणे तर सोडा एक शतकही करु देणार नाही

-टीम इंडिया अव्वल स्थान पुन्हा मिळविण्याचे समीकरण?