एकवेळ मॅगी खाऊन दिवस काढणाऱ्या खेळाडूला बीसीसीआयचा मोठा पुरस्कार

बेंगलोर | काल बेंगलोर येथे बीसीसीआयचा वार्षिक पुरस्कार वितरण कार्यक्रम पार पडला. यामध्ये कर्णधार विराट कोहलीला आंतरराष्ट्रीय तर कृणाल पंड्या, परवेझ रसूल, जलज सक्सेना यांना देशांतर्गत क्रिकेटमध्ये 2017-18 मोसमात प्रभावी कामगिरी केल्याबद्दल विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.

देशांतर्गत मर्यादित क्रिकेटमध्ये विशेष कामगिरी  केल्याबद्दल कृणाल पंड्याला लाला अमरनाथ सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडूचा पुरस्कार मिळाला.

सध्या भारतीय अ संघाच्या इंग्लंड दौऱ्यावर असल्यामुळे कृणाल या पुरस्कार वितरणा प्रसंगी उपस्थित राहू शकला नाही. कृणालच्या वतीने हार्दिक पंड्याने हा पुरस्कार स्विकारला.

हा पुरस्कार मिळाल्यानंतर टि्वटरवरून हार्दिक पंड्या आणि बीसीसीआयचे कृणालने अभार मानले. तो म्हणाला, आत्मविश्वास आणि कष्ट! 2016-2017 चा लाला अमरऩाथ पुरस्कार मिळाल्यामूळे मी आनंदित आहे. माझ्या या प्रवासात मला साथ दिलेल्या हार्दिक शिवाय हा पुरस्कार स्विकारण्यासाठी दुसरे कोणी पात्र असू शकत नाही.

देशांतर्गत क्रिकेटमध्ये सध्याच्या काळात कृणाल पंड्या सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू आहे. कृणालने आजपर्यंत खेळलेल्या 25 लिस्ट ए सामन्यात 32.79 सरासरीने 787 धावा करत 27 बळी मिळवले आहेत.

तसेच आयपायलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळताना 39 सामन्यात 708 धावा आणि 28 बळी मिळवले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

यो यो फिटनेस टेस्ट म्हणजे काय रे भाऊ?

भारतीय गोलंदाजामुळेच भारतीय संघ येणार कसोटी सामन्यात अडचणीत!