३०० व्या सामन्यासाठी युवीवर शुभेच्छांचा वर्षाव

भारताचा अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग आज कारकिर्दीतील ३००वा एकदिवसीय सामना खेळत आहे. जेव्हा आज युवी बांगलादेशविरुद्ध आयसीसी चॅम्पियन ट्रॉफीमध्ये उपांत्यफेरीत खेळण्यासाठी मैदानात उतरेल तेव्हा तो त्याचा ३००वा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना राहील. यापूर्वी भारताकडून सचिन (४६३), द्रविड(३४०), अजहरुद्दीन(३३४), गांगुली (३०८) यांनी ही कामगिरी केली आहे.

युवराज सिंगला खास सामन्यासाठी दिग्गजांनी शुभेच्छा दिल्या आहेत. त्यात व्हीव्हीएस लक्ष्मण, हरभजन सिंग, वीरेंदर सेहवाग, सचिन तेंडुलकर, मोहम्मद कैफ यांचा समावेश आहे.

 त्यातील निवडक शुभेच्छा!