क्रिकेटला द्रविड, धोनी सारख्या खेळाडूंची गरज

क्रिकेटमध्ये भारताचे माजी कर्णधार राहुल द्रविड आणि एमएस धोनी यांना त्यांच्या शांत आणि सभ्य स्वभावामुळे ओळखले जाते. त्यामुळे अशा खेळाडूंची क्रिकेटला गरज असल्याचे मत आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्हिड रिचर्डसन यांनी मांडले आहे.

एमसीसी 2018 कॉऊड्रे लक्चर्समध्ये बोलताना त्यांनी क्रिकेटमध्ये होणारे स्लेजिंग आणि फसवणूक याबद्दल चिंता व्यक्त करताना खेळाडू आणि प्रशिक्षकांनी यासाठी पुढाकार घेण्याचा सल्ला दिला आहे.

ते म्हणाले, “क्रिकेट मैदानात तुम्हाला कॉलिन मिलबर्न, फ्रेडी फ्लिंटॉफ, शेन वॉर्न, विराट कोहली, बेन स्टोक अशा महानायकांची गरज असते पण त्याचबरोबर क्रिकेटला फ्रॅंक वॉरल्स, एमएस धोनी, राहुल द्रविड, कॉलिन कॉऊड्रे यांचीही गरज असते, जेणेकरुन आपण योग्य दिशेने जाऊ.”

याबरोबरच त्यांनी नेल्सन मंडेला यांचे खेळाबद्दलचे मत सांगताना म्हणाले, “नेल्सन मंडेला हे योग्य होते जेव्हा ते म्हणाले की खेळामध्ये जगाला बदलण्याची ताकद आहे. यामध्ये लोकांना एकत्र आणण्याची ताकद आहे. तरुणांना हव्या असणाऱ्या भाषेत खेळ बोलतो. जिथे निराशा आहे तिथे खेळ आशा निर्माण करु शकते.”

तसेच पुढे दक्षिण आफ्रिकेचे माजी फलंदाज असणारे रिचर्डसन म्हणाले की आयसीसीकडे सर्वच प्रश्नांची उत्तरे नाहीत पण आपण सर्व मिळून ती सोडवू शकतो.

रिचर्डसन खेळाडूंच्या गैरवर्तवणूकीबद्दल बोलताना म्हणाले, “वैयक्तीक गैरवर्तन,बाद झालेल्या फलंदाजाला सेंडआॅफ देणे, पंचांच्या निर्णयाचा अपमान करणे, शारिरिक गैरवर्तण करणे आणि चेंडू छेडछाड या अशा गोष्टी आहेत ज्यांचा आपण जागतीक स्तरावर खेळाला ओळख करुन देताना आदर्श ठेऊ शकत नाही.”

तसेच ते म्हणाले खेलाडूवृत्तीने खेळ खेळने म्हणजे काय, याबद्दल खेळाडूंना जागरुक करण्यासाठी आयसीसीचे प्रयत्न चालू आहेत.

त्याचबरोबर रिचर्डसन यांनी द्विपक्षिय मालिकेत पाहुण्या संघाचा यजमान संघाने सन्मान करावा असेही म्हटले आहे.

याबरोबरच त्यांनी आजकाल ज्याप्रकारे खेळाडूंच्या चूकीच्या गोष्टीलाही प्रशिक्षक पाठिंबा देतात आणि सामना पंचांकडे मैदानावरील पंचानी पक्षपात केल्याची तक्रार करतात याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

जिंकणे हे खेळात मुख्य ध्येय असतेच पण त्यासाठी खेळाला धक्का बसेल अशी कोणतीही तडजोड करु नका, असेही रिचर्डसन यांनी सांगितले.

तसेच त्यांनी चेंडू छेडछाड प्रकरणाबद्दलच्या नियमाबद्दल बोलताना सांगितले की, “त्याचा नियम साधा आणि सरळ आहे. चेंडूशी अनैसर्गिकरित्या छेडछाड करु नका आणि जर तुम्ही असे करताना सापडला तर तक्रार करु नका. असेही सांगू नका की दुसऱ्यांनी केले आहे, हा बचाव नाही. तूम्ही फसवणूक करत आहेत. ”

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

इंग्लंड येणार गोत्यात?, महत्त्वाचा खेळाडू अडकला कायद्याच्या कचाट्यात

-फलंदाजाचे शतक होऊ नये म्हणुन क्रिकेटमध्ये घडला हा घाणेरडा प्रकार

-स्टार्क म्हणतो, विराट थोडा थांब, तुझे अव्वल स्थान हा खेळाडू घेईल