माजी कर्णधार म्हणतो, हे केल्याशिवाय चहलला कसोटी संघात स्थान नाही

बेंगलोर | भारताचा युवा फिरकीपटू युजवेंद्र चहलने कुलदीप यादवच्या साथीने गेल्या एक ते दिड वर्षापासून मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये भारतासाठी जबरदस्त कामगिरी केली आहे.

चहल-कुलदीपने भारतासह दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडही गाजवले आहे.

या जोडीच्या धमाकेदार कामगिरीमुळे मर्यादीत षटकांच्या सामन्यासाठी भारतीय संघातून अनुभवी फिरकीपटू आर अश्विन आणि रविंद्र जडेजाला आपले स्थान गमवावे लागले आहे.

कुलदीप यादवने यापूर्वीच भारताच्या कसोटी संघात स्थान मिळवले आहे. तर युजवेंद्र चहल आणखी कसोटी संघात प्रवेश करण्याच्या प्रतिक्षेत आहे.

जर  चहलला भारतीय कसोटी संघात स्थान मिळवायचे असेल तर त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये जास्तीत जास्त कसोटी सामने खेळायला हेवे आहेत.

असे मत भारताचा माजी कर्णधार आणि युवा संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविडने व्यक्त केले आहे.

“युजवेंद्र चहल असा गोलंदाज आहे, ज्याच्यावर भारतीय निवड समिती कसोटी संघात त्याला स्थान देण्यासाठी लक्ष ठेउन आहे. जर त्याला कसोटी संघात स्थान मिळवायचे असेल तर देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याने जितके शक्य होईल तितके  कसोटी सामने खेळायला हेवेत.” असे राहुल द्रविड म्हणाला.

भारत अ आणि दक्षिण आफ्रिका अ यांच्यात झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यानंतर द्रविडने बोलताना, चहलसह मयांक अगरवाल, पृथ्वी शॉ आणि मोहम्मद सिराज यांनी गेल्या काही काळात केलेल्या सातत्यपूर्ण कामगिरीवर समाधान व्यक्ते केले.

तेसेच हे क्रिकेटपटू युवा आहेत आणि वेळेबरोबर त्यांच्यात परिपक्वता येइल असा विश्वास द्रविडने व्यक्त केला.

भारत अ आणि दक्षिण आफ्रिका अ यांच्यातील अनाधिकृत कसोटी सामन्यात भारताने एक डाव आणि ३० धावांनी विजय मिळवला आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

-स्टार्क म्हणतो, विराट थोडा थांब, तुझे अव्वल स्थान हा खेळाडू घेईल

-फलंदाजाचे शतक होऊ नये म्हणुन क्रिकेटमध्ये घडला हा घाणेरडा प्रकार