बापरे! गांगुलीचे इंस्टाग्राम अकाऊंट आहे फेक

भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने त्याच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन एक महत्त्वाचा खुलासा केला आहे.

भारत इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात भारत पराभूत झाल्यानंतर गांगुलीने विराट कोहलीला दुसऱ्या सामन्यासाठी संघ न बदलण्याचा सल्ला दिला होता. अशा आशयाचे वृत्त अनेक वृत्तपत्रांमधून प्रसिद्ध झाले होते.

या वृत्तपत्रांनी सौरव गांगुलीच्या इंस्टाग्राम अकाउंटवरच्या पोस्टचा आधार घेत हे वृत्त प्रसिद्ध केले होते.

मात्र सौरव गांगुलीने इंस्टाग्राम विराटला कोणताही सल्ला देणारी पोस्ट शेअर केली नाही असा खुलासा त्याच्या अधिकृत ट्विटर आकाउंटवरुन केला आहे.

यावेळी सौरव गांगुलीने त्याच्या ट्विटमधून प्रसार माध्यमांना त्या इंस्टाग्राम अकांउटवरुन काहीही बातमी करु नका ते इंस्टाग्राम अकाउंट फेक आहे, असे आवाहन केले आहे.

त्यापूर्वी सौरव गांगुलीच्या फेक इंस्टाग्राम अकाउंटवर खालील आशयाची पोस्ट शेअर केली होती.

“सातत्याने अंतिम ११ खेळाडूंच्या संघात बदल केल्याने खेळाडूंवर चांगली कामगिरी करण्याचा दबाव येत आहे. या दबावातच त्यांची कामगिरी निराशजनक होत आहे. त्यामुळे मला वाटते की विराट आणि रवि शास्त्रींनी पहिल्या सामन्यातील संघच पुढील सामन्यासाठी खेळवावा.”

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

-कपिल देव शतकात एकदाच जन्माला येतो

-मोहम्मद सिराज चमकला; टीम इंडियाची दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मोठ्या विजयाकडे वाटचाल