पुढील सहा आठवडे आघाडीचा फलंदाज दक्षिण आफ्रिका संघातून बाहेर

श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पाच सामन्यांची एकदिवसीय मालिका सुरु आहे.

या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात सोमवारी (५ ऑगस्ट) दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकेवर ७८ धावांनी विजय मिळवला.

मात्र यामध्ये कर्णधार फाफ डु प्लेसिसच्या खांद्याला दुखापत झाल्यामुळे दक्षिण आफ्रिकेला जोरदार धक्का बसला आहे.

त्यामुळे फाफ डु प्लेसिस श्रीलंके विरुद्धच्या उर्वरित दोन एकदिवसीय सामने आणि एकमेव टी-२० सामन्याला मुकणार आहे.

फाफ डु प्लेसिसला खांद्याच्या या दुखापतीतून पूर्णपणे बरे होण्यासाठी पुढील सहा आठवड्यांचा कालावधी लागणार आहे.

या तिसऱ्या सामन्यातील विजयासह दक्षिण आफ्रिकेने मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी घेतली आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

-हे दोन भाऊ खेळू शकतात कसोटी मालिकेत एकाच संघाकडून

-इंग्लंडच्या दिग्गज महिला क्रिकेटपटूबरोबर अर्जुन तेंडुलकरचे खास डीनर