या वर्षी दक्षिण अफ्रिकेत होणार आयपीएलप्रमाणेच मोठ्या लीगचे आयोजन

आयपीएलच्या धरतीवर अनेक देशातील क्रिकेट संघटनांनी स्वत:च्या टी-20 लीग सुरु केल्या आहेत. त्या पार्श्वभुमीवर दक्षिण अफ्रिका क्रिकेट मंडळाने अधिकृतरीत्या एका टी-20 लीगची घोषणा केली आहे. ‘एमझांसी सुपर लीग’ असे या लीगचे नाव आहे.

ह्या स्पर्धेला 16 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. स्पर्धेचा अंतिम सामना 16 डिसेंबरला होणार आहे.

या स्पर्धेत दक्षिण अफ्रिकेच्या खेळाडूंबरोबरच इतर देशांतील खेळाडूंना देखील संधी देण्यात येणार आहे. या स्पर्धेत 6 संघ सहभागी होणार आहेत.

“या स्पर्धेसाठी  फन फास्ट फाॅर आॅल अशी टॅगलाईन वापरण्यात आली आहे. ह्या टॅगलाईनमधून स्पर्धेचे स्वरूप स्पष्ट होत आहे.” असे क्रिकेट दक्षिण अफ्रिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी थबांग मोरोई यांनी सांगितले.

एमझांसी सुपर लीग या स्पर्धेसाठी सर्वांनी खुप कष्ट घेतले आहेत. आम्ही या स्पर्धेकडे खुप सकारात्मक दृष्टीने पाहत आहोत. ही स्पर्धा मनोरंजक होईल. या जगातील सर्वोत्तम खेळाडू सहभाग घेणार आहेत. असे थबांग मोरोई यांनी सांगितले.

“दक्षिण अफ्रिकेतील चाहत्यांसाठी आम्ही एक नवीन क्रिडा स्पर्धेचे आयोजन करत आहोत. याचा  आपल्याला अभिमान वाटत आहे.” असे स्पर्धेचे मुख्य कार्यवाहक ख्रिस मोरोलेंग यांनी सांगितले.

एमझांसी सुपर लीग या स्पर्धेतील संघ, सामन्यांचे ठिकाण तसेच सामन्यांच्या वेळा यासंबधी माहिती पुढील आठवड्यात प्रसिद्ध होईल.

महत्वाच्या बातम्या-