तीन वर्षात प्रथमच दक्षिण आफ्रिका लाजीरवाण्या धावसंख्येवर गारद

गाले | गाले आंतरराष्ट्ररीय क्रिकेट मैदानावर सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात श्रीलंकेने दक्षिण अफ्रेकेला पहिल्या डावात १२६ धावांवर गारद केले.

दक्षिण आफ्रिकेने गेल्या तीन वर्षात प्रथमच इतकी निचांकी धावसंख्या गाठली.

यापूर्वी ३ डिसेंबर २०१५ साली भारताने दक्षिण अफ्रिकेला दिल्ली कसोटी सामन्यात १२१ धावांवर रोखले होते.

त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेची श्रीलंकेतील ही कसोटी क्रिकेटमधील निचांकी धावसंख्या ठरली.

श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात सर्वबाद २८७ धावा केल्या होत्या. यामध्ये श्रीलंकन सलामीवीर दिमुथ करुनारत्नेचे १५८ धावांचे योगदान होते. करुनारत्नेने आपल्या शतकी खेळीत १३ चौकार आणि एक षटकार लगावले.

त्यानंतर श्रीलंकन गोलंदाज दिलरुवान परेराने ४ बळी आणि सुरंगा लकमलने ३ बळी घेत दिग्गज दक्षिण आफ्रिकेला १२६ धावांवर रोखत १६१ धावांची आघाडी घेतली.

दक्षिण आफ्रिकेकडून कर्णधार फाफ डू प्लेसिसने  सर्वाधिक ४९ धावा केल्या.

दुसऱ्या दिवसाच्या खेळ संपला तेव्हा श्रीलंकेने दुसऱ्या डावत ४ बाद १११ धावा करत दक्षिण आफ्रिकेवर २७२ धावांची आघाडी मिळवली होती.

महत्त्वाच्या बातम्या-

-२८ वर्षीय माजी क्रिकेटपटूचा इंग्लंड क्रिकेट संघाच्या निवड समितीमध्ये समावेश

-मुंबई रणजी संघाच्या प्रशिक्षकपदी विनायक सामंत यांची निवड