पहा: इंग्लंडचा बेन स्टोक्सच्या हाणामारीचा विडिओ व्हायरल

इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोकच्या हाणामारीचा विडिओ आता समोर आला आहे. एका प्रत्यक्ष उपस्थित असलेल्या नागरिकाच्या म्हणण्यानुसार एका मिनटात स्टोक्सने तब्बल १५ पंच समोरच्या व्यक्तीला मारले. त्याचमुळेच त्याचे बोट मोडले आहे.

यावेळी स्टोक्सबरोबर असलेला अॅलेक्स हेल्स सतत स्टोक्सला शांत राहण्याचं आवाहन करत होता परंतु तो कोणत्याही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. स्टोक्सने ज्या व्यक्तीला जखमी केले त्याच्या चेहऱ्याला इजा झाली आहे.

सोमवारी बेन स्टोक्सला अटक करण्यात आली होती. नाईटक्लबमध्ये मारहाण केल्याचा आरोप त्याच्यावर होता. चौकशीनंतर त्याला सोडूनही देण्यात आले. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने त्याच्यावर कारवाई म्हणून विंडीज विरुद्धच्या ४ थ्या व ५ व्या वनडे सामन्यांसाठी त्याला वगळले.

यावर्षीची अॅशेस मालिका ऑस्ट्रेलियात होणार असून २३ नोव्हेंबर पासून या मालिकेला सुरुवात होईल. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघात होणारी ही मालिका मानाची मानली जाते.

पहा विडिओ: