म्हणूनच पुजारा पहिल्या कसोटीसाठी संघात हवा होता

बर्मिंगहॅम। भारत-इंग्लंड यांच्यात पहिल्या कसोटी सामन्याला बुधवारी (१ ऑगस्ट) बर्मिंगहॅमच्या एजबेस्टन मैदानावर सुरवात झाली आहे.

या सामन्यात भारतीय संघातून भरवशाचा फलंदाज चेतेश्वर पुजाराला वगळून त्याच्या जागी केएल राहुलला स्थान देण्यात आहे.

तर सराव सामन्यात दोन्ही डावात शून्यावर बाद झालेल्या शिखर धवनला देखील अंतिम ११ खेळाडूंच्या संघात स्थान मिळाले आहे.

चेतेश्वर पुजाराला संघातून वगळल्याबद्दल अनेक क्रिकेट जानकारांनी यावर आश्चर्य व्यक्त केले आहे.

गेल्या काही दिवासांपासून पुजारा आपल्या फॉर्मशी झुंजत आहे. तसेच गेली तीन महिने पुजारा इंग्लंडमधील कौंटी क्रिकेट मध्येही समाधानकार कामगिरी करु शकला नाही.

असे असले तरी आकडेवारी मात्र चेतेश्वर पुजाराच्या बाजूने आहे.

जर आकडेवारीत बोलायचे झाल्यास पुजारा ज्या ५८ कसोटी सामन्यात खेळला आहे, त्यामध्ये भारताला ३३ विजय मिळाले आहेत. तर १२ सामन्यात भारत पराभूत झाला आहे. तसेच पुजारा संघात असताना भारताला १३ सामने अनिर्णित राखण्यात यश आले आहे.

त्यामुळे पुजारा जेव्हा अंतिम ११ खेळडूंच्या संघात असतो तेव्हा भारताच्या विजयाची टक्केवारी ५६.९० असते.

भारतीय संघ पुजाराशिवाय २३ कसोटी सामने खेळला आहे. त्यामध्ये भारताला फक्त ६ सांमन्यात विजय मिळाला आहे. तर १० सामन्यात भारत पराभूत झाला आहे आणि ७ सामने अनिर्णित राहिले आहेत.

या आकडेवारीकडे पाहता इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी पुजाराला अंतिम ११ खेळाडूंच्या संघात स्थान मिळायला हवे होते. मात्र तसे झाले नाही.

आता संघ व्यवस्थापनाचा हा निर्णय योग्य होता की अयोग्य हा सामना झाल्यानंतरच कळेल.

पुजाराच्या जागी भारतीय संघात स्थान मिळालेल्या केएल राहुलने आजपर्यंत २४ कसोटी सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याने ४०.८६ च्या सरासरीने १५१२ धावा केल्या आहेत. त्यामध्ये ४ शतकांचा समावेश आहे.

तर पुजारा त्याच्या कसोटी कारकिर्दीत भारतासाठी ५८ सामने खेळला आहे. त्याने ५०.३४ च्या सरासरीने ४५३१ धावा केल्या आहेत. त्यामध्ये १४ शतकांचा समावेश आहे.

२०१४ साली पुजाराने इंग्लंड दौऱ्यात ५ कसोटी सामन्यात २२ च्या सरासरीने २२२ धावा केल्या होत्या.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

-माईक ड्राॅप ते बॅट ड्राॅप- काय आहे कोहली रुटमधील ‘बॅट ड्रॉप’ सेलिब्रेशन

-भारताकडून २९० खेळाडू कसोटी खेळले, परंतु अशी कामगिरी करणारा अश्विन एकटाच