सचिन करु शकतो, तर मी का नाही

भारत-इंग्लंड यांच्यात ९ ऑगस्टपासून लॉर्ड्स मैदानावर होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी २० वर्षीय ओली पोपची इंग्लंड संघात निवड झाली आहे.

याच ओली पोपच्या म्हणण्यानुसार जर सचिन तेंडूलकर भारतासाठी १६ व्या वर्षी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करुन यशस्वी होऊ शकतो, तर मी का होणार नाही असे मत व्यक्त केले आहे.

“सचिन तेंडूलकरने १६ किंवा १७ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तरीही तो महान खेळाडू झाला. तसेच यापूर्वी इंग्लंडचा माजी कर्णधार अॅलिस्टर कुकने देखील २० व्या वर्षीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यामुळे मला वाटत नाही की माझे वय माझ्या वाटेतील अडचण ठरेल.” असे ओली पोप पत्रकारांशी बोलताना म्हणाला.

“सध्या कोण काय म्हणते यापेक्षा मला मिळालेल्या या संधीचा लाभ घेण्यासाठी मी जास्त उत्सुक आहे. मला विश्वास आहे की मी माझ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटची सुरवात समाधानकारक करेन.” असे ओली पोप पुढे म्हणाला.

दुसऱ्या सामन्यासाठी इंग्लंडच्या १३ सदस्सीय संघात मधल्या फळीतील फलंदाज डेव्हिड मलानला वगळून २० वर्षीय युवा फलंदाज ओली पोपला संधी देण्यात आली आहे.

२० वर्षीय ओली पोपने त्याच्या प्रथम श्रेणी क्रिकेट कारकिर्दीला धडाक्यात सुरवात केली आहे. त्याने त्याच्या पहिल्या १५ सामन्यातच प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १००० धावा केल्या आहेत.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

-जागतिक महिला हॉकी क्रमवारीत भारताची आगेकूच

-इंग्लंड येणार गोत्यात?, महत्त्वाचा खेळाडू अडकला कायद्याच्या कचाट्यात