इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात मिळणार ‘या’ तीन खेळाडूंना डच्चू?

बर्मिंगहॅम। १ ते ४ आॅगस्ट दरम्यान एजबस्टन मैदानावर पार पडलेल्या इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताला चौथ्याच दिवशी ३१ धावांनी निसटता पराभव स्विकारावा लागला आहे.

त्यामुळे गचाळ कामगिरी करणाऱ्या शिखर धवन, यष्टीरक्षक दिनेश कार्तिक आणि उमेश यादवला दुसऱ्या कसोटी सामन्यात अंतिम ११ खेळाडूंच्या संघातून डच्चू मिळण्याची शक्यता आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना ९ ते १३ ऑगस्ट दरम्यान लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर होणार आहे.

या सामन्यात शिखर धवन, यष्टीरक्षक दिनेश कार्तिक आणि उमेश यादवला वगळून भारतीय संघ चेतेश्वर पुजारा, युवा यष्टीरक्षक ऋषभ पंत आणि जसप्रीत बुमराह संधी देण्याची शक्यता आहे.

एसेक्स विरुद्धच्या सराव सामन्यातील दोन्ही डावात शून्यावर बाद होऊनही पहिल्या कसोटीसाठी शिखर धवनला संधी देण्यात आली होती. मात्र या सामन्यातही शिखर धवन पूर्णपणे निष्प्रभ ठरला. धवनने या सामन्यातील पहिल्या डावात २६ तर दुसऱ्या डावात फक्त १३ धावा केल्या होत्या. त्यामुळे शिखर धवनला वगळून चेतेश्वर पुजाराचा संघात समावेश होउ शकतो.

भारतीय कसोटी संघाचा नियमित यष्टीरक्षक ऋध्दीमान साह दुखापतग्रस्त असल्याने भारताने दिनेश कार्तिक आणि ऋषभ पंतची या मालिकेसाठी निवड केली आहे.

मात्र पहिल्या सामन्यात अंतिम ११ खेळाडूंच्या संघात संधी मिळूनही कार्तिकला चांगली कामगिरी करण्यात अपयश आले. त्याने या सामन्याच्या दोन्ही डावात मिळून फक्त २० धावा केल्या होत्या.

यातील पहिल्या डावात कार्तिक शून्यांवर बाद झाला तर दुसऱ्या डावात त्याला २० धावाच करता आल्या. तसेच यष्टीरक्षण करताना त्याच्याकडून झेलही सुटले. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात कर्णधार कोहली आणि प्रशिक्षक रवि शास्त्री ऋषभ पंतला संधी देण्यासाठी प्रयत्नशील असतील.

एजबस्टन पहिल्या कसोटी सामन्यात उमेश यादव वगळता सर्व गोलंदाजांनी उत्कृष्ठ कामगिरी केली.

मात्र उमेशला या सामन्यात फरशी चांगली कमागिरी करता आली नाही. त्याला दोन्ही डावात मिळून फक्त तीन विकेट घेता आल्या. यातील पहिल्या डावात एक तर दुसऱ्या डावात इंग्लंडच्या तळातील दोन फलंदाजांना त्याने बाद केले.

त्यामुळे दुसऱ्या कसोटी सामन्यात उमेश यादवच्या जागी जसप्रीत बुमराहला संधी मिळू शकते.

अायर्लंड विरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात बोटाला दुखापत झाल्याने तो इंग्लंड विरुद्धच्या टी-२० आणि एकदिवसीय मालिकेला मुकला होता.

जर बुमराह पूर्णपणे तंदुरुस्त असल्यास दुसऱ्या कसोटीसाठी अंतिम ११ खेळाडूंच्या संघात त्याची जागा नक्की आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

-यामुळेच इशांत शर्माने पहिल्या सामन्यात मिळवल्या ८ विकेट

-भारताच्या पराभवाला कर्णधार कोहलीही तितकाच जबाबदार