टीम इंडियाने कर्णधार कोहलीला हमाल बनवून ठेवले आहे

बर्मिंगहॅम। भारत विरुद्ध इंग्लंड संघात सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात तिसऱ्या दिवसाखेर (शुक्रवारी, 3 आॅगस्ट) भारताने 5 बाद 110 धावा केल्या अाहेत.

विजयासाठी भारताला अजून 84 धावांची गरज आहे. तर इंग्लंडला 5 विकेट्सची गरज आहे. त्यामुळे दोन्ही संघाना विजयाची समान संधी आहे.

इंग्लंडने भारतासमोर विजयासाठी 194 धावांचे आव्हान ठेवले आहे.

पण या धावांचा पाठलाग करताना पहिल्या डावाप्रमाणे भारताची दुसऱ्या डावात फलंदाजांची फळी पुन्हा एकदा ढेपाळली.

त्यामुळे भारतीय चाहत्यांनी अजिंक्य रहाणेसह, शिखर धवन, केएल राहुल आणि मुरली विजयवर जोरदार टीका करत दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी अंतिम 11 खेळाडूंच्या संघात चेतेश्वर पुजाराचा समावेश करण्याची मागणी केली आहे.

तर दोन्ही डावात भारतासाठी एकाकी झुंज देणाऱ्या विराट कोहलीला टीम इंडियाचे हमाल कोले आहे असेही एका चाहत्याने ट्विटमधून अन्य फलंदाजांवर टीका करताना म्हणले आहे.

यापूर्वी या सामन्याच्या सुरवातीलाच भारताचा मधल्या फळीतील फलंदाज चेतेश्वर पुजाराला अंतिम अकरा खेळाडूंच्या संघातून वगळण्यात आल्यामुळे भारतीय संघ व्यवस्थापनावर सर्वच स्तरातून जोरदार टीका झाली होती.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

-साहेबांच्या भूमीवर मराठमोळ्या स्म्रीती मानधनाचे वर्चस्व

-एकेकाळी टीम इंडियावर तुटून पडणारा गोलंदाजही म्हणतो विराट कोहली भारी