नक्कल करणाऱ्या वेदा कृष्णमूर्तीला शाहिद आफ्रिदीने दिले असे उत्तर

सुंदर झेल घेतल्यावर शाहिद आफ्रिदीसारखे सेलेब्रेशन करणाऱ्या वेडा कृष्णमूर्तीने पुन्हा एकदा तमाम क्रिकेटजगताचे लक्ष आपल्याकडे वेधले आहे. तिने एक खास ट्विट करून सोशल मीडियावर या सेलेब्रेशनचा फोटो शेअर केला आहे.

बिग बॅश लीगमध्ये हॉबर्ट हर्रीकॅन्सकडून खेळणाऱ्या वेदा कृष्णमूर्ती या स्टार भारतीय महिला क्रिकेटपटूने परवा आपल्या चांगल्या क्षेत्ररक्षणाच्या जोरावर बेथ मुनीला तंबूत पाठवले. सामना झाल्यावर तिने एक खास फोटो शेअर करत शाहिद आफ्रिदी सारखे आपण या छायाचित्रात दिसत असल्याचे विचारले.

“मी शाहिद आफ्रिदी सारखे सेलेब्रेशन केलंय का? कसं होत हे सेलेब्रेशन? ” असा ट्विट तिने केला आहे.

यावर पाकिस्तानचा महान अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदीने खास उत्तर दिले आहे. ” चांगला प्रयत्न आहे. चांगले कष्ट घे आणि महत्वाचं म्हणजे तिथे तू विकेट्स घे. ” असे तो आपल्या ट्विटमध्ये म्हणतो.

यानंतर तिने शाहिदचे आभार मानणारे ट्विट केले आहे.