पहा विडीओ- अखेर विरेंद्र सेहवागला सापडला लिओनेल मेस्सीचा चाचा

भारताचा माजी सलामीवीर फलंदाज विरेंद्र सेहवाग त्याच्या अफलातून फलंदाजीसाठी प्रसिद्ध होता. त्याचे फलंदाजी करतानाचे फटके पाहुन चाहते तृप्त व्हायचे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारल्यानंतरही सोशल मिडीयाच्या माध्यमातून सेहवागने आपली फटकेबाजी चालू ठेवली आहे. सेहवाग त्याच्या मजेशीर ट्विटसाठी प्रसिद्ध आहे.

सध्या फिफा विश्वचषक सुरु असल्याने सगळीकडे फुटबॉलचा ज्वर वाढत आहे.

विश्वचषकातून अर्जेंटीना, पोर्तूगाल, जर्मनी आणि ब्राझील सारखे तगडे संघ बाहेर पडले आहेत.

याचा धागा पकडत सेहवागने त्याच्या ट्विटर आकाउंटवर एका वयस्कर व्यक्तीचा फुटबॉल खेळतानाचा व्हीडीओ शेअर केला आहे.

या ट्विटमध्ये सेहवागने, फ्रान्स, इंग्लंड आणि क्रोएशिया यांना विसरा आणि या  फुटबॉलपटूचा शॉट पहा असे लिहले आहे.

त्यामध्ये त्या वयस्कर व्यक्तीने अप्रतिमरीत्या एक फुटबॉल शॉट खेळलेला दिसत आहे.

 

तसेच सेहवागने हाच व्हीडीओ त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर ‘मेस्सी के चाचा’ हा हॅश टॅग वापरत शेअर केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-तिसऱ्या क्रमांकावर आज कोण? कोहली की केएल राहुल?

-वनडेत १० हजार धावा करण्याबरोबरच ३ खास विक्रम आज धोनीला करण्याची संधी