एमएस धोनीचा दृढनिश्चय, पुढच्या आयपीएलपर्यंत मी हे शिकणारच

टीम इंडियाचा माजी कर्णधार एमएस धोनीने आपीएलच्या पुढच्या मोसमापर्यंत तमिळ भाषा शिकण्याचा निर्धार केला आहे.

तामिळनाडू प्रीमिअर लीगमधील मदुराई पँन्थर्स आणि कोवाई किंग्स यांच्यातील सामन्याच्या दरम्यान टॉसवेळी लक्ष्मण शिवराम कृष्णण यांच्याशी बोलताना धोनीने हे सांगितले.

“दरवर्षी आयपीएल दरम्यान मी तमिळ शिकण्याचा प्रयत्न करतो  पण एकदा आपीएलचा मोसम संपला की मी पुन्हा जे शिकलोय ते विसरतो.”

“गेल्या कही वर्षात मी थोडेफार तमिळ शिकलोय. पण आयपीएलच्या पुढच्या मोसमापर्यंत मी चांगल्या प्रकारे तमिळ शिकण्याचा प्रयत्न करणार आहे.” असे धोनी या सामन्याच्या टॉसवेळी म्हणाला.

एमएस धोनी नुकतेच भारताच्या इंग्लंड दौऱ्यातील टी-२० आणि एकदिवसीय मालिका खेळूण मायदेशी परतला आहे.

या इंग्लंड दौऱ्यात त्याची कामगिरी समाधानकारक झाली नव्हती त्यामुळे त्याला अनेक चाहत्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते.

तसेच इंग्लंड विरुद्धच्या वन-डे मालिकेनंतर धोनी मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याच्या चर्चादेखील होत्या.

मात्र भारताचे प्रशिक्षक रवि शास्त्रींनी तो निवृत्ती घेणार नसल्याचा अधिकृत खुलासा केल्याने या चर्चेला पूर्णविराम मिळाला होता.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या-

-मयांक अगरवाल, पृथ्वी शाॅच्या फटाकेबाजी समोर दक्षिण आफ्रिका अ उध्वस्त

-कुठे गेला तुमचा कोहली?