विश्वचषक विजेते होणार मालामाल , चमचमत्या ट्राॅफीसह मिळणार एवढी रक्कम

२०१९ क्रिकेट विश्वचषक विजेत्या संघाला तब्बल ४ मिलीयन अमेरिकन डाॅलर मिळणार आहेत. याची घोषणा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने शुक्रवारी केली.

या संपुर्ण विश्वचषकात एकूण १० मिलीयन अमेरिकन डाॅलरचे बक्षीस दिली जाणार आहेत. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने आयोजीत केलेला हा विश्वचषक ३० मे रोजी सुरु होईल आणि ४६ दिवस चालेल.

या स्पर्धेचे प्रबळ दावेदार आणि आयोजक इंग्लंड ३०मे रोजी स्पर्धेतील पहिलाच सामना दक्षिण आफ्रिका संघासोबत ओव्हल मैदानावर खेळेल.

क्रिकेट विश्वचषकात  विजेत्यांना २०१५मध्ये तब्बल ३.९७ मिलियन अमेरिकन डाॅलर, उपविजेत्यांना १.७५ मिलियन अमेरिकन डाॅलर तर तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या संघाला ०.६ मिलियन अमेरिकन डाॅलर मिळाले होते. यावर्षी ही रक्कम वाढविण्यात आली आहे. यावेळी विजेत्याला क्रिकेट विश्वचषकात  विजेत्यांना  ४ मिलियन अमेरिकन डाॅलर, उपविजेत्यांना २ मिलियन अमेरिकन डाॅलर तर तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या संघाला ०.८ मिलियन अमेरिकन डाॅलर दिले जाणार आहेत.

याचा अर्थ फूटबाॅल विश्वचषकात जो संघ साखळी फेरीतून बाहेर पडतो त्याला मिळणाऱ्या रकमेच्या अर्धीही रक्कम क्रिकेट विजेत्या संघाला मिळतं नाही.

आयसीसी विश्वचषक २०१९ बक्षीस रक्कम

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.