महिला विश्वचषक: मिताली राजवर कौतुकाचा वर्षाव

भारतीय क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजने महिला एकदिवसीय क्रिकेटमध्ये कारकिर्दीत ६००० धावा केल्या आहे. अशी कामगिरी करणारी ती जगातील पहिली आणि एकमेव खेळाडू आहे.

महिला क्रिकेटच्या तीनही प्रकारात कोणत्याही खेळाडूने आजपर्यत ६००० धावांचा टप्पा पार केलेला नव्हता. महिला क्रिकेटमधील दिग्गज संघ असणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध खेळताना तिने हा पराक्रम केला.

साहजिकच हा विश्वविक्रम केल्यामुळे मितालीवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. त्यात अजिंक्य रहाणे, गौतम गंभीर या दिग्गज खेळाडूंचाही समावेश आहे.