क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेच्या वडिलांना अटक, चारचाकीच्या धडकेत महिलेचा मृत्यू

भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेच्या वडिलांना कागल पोलिसांनी आज अटक केली. त्याच्या चार चाकीने धडक दिल्यामुळे एका महिलेचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथे शुक्रवारी सकाळी ही घटना पुणे-बंगळुरु महामार्गावर घडली.

अजिंक्य रहाणेचे वडील मधुकर बाबुराव रहाणे यांना आशाताई कांबळे यांच्या या अपघातात मृत्यू झाल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

कागल येथे पुणे-बंगळुरु महामार्गावर रस्ता ओलांडत असताना मधुकर रहाणेंच्या गाडीची ६७वर्षीय महिलेला धडक बसली. त्यांना तेथील एका नागरिकाने तातडीने दवाखान्यात नेले परंतु उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

यावेळी गाडी कोण चालवत होते हे मात्र अजून समजले नाही.

अजिंक्य रहाणे भारताकडून ४३ कसोटी, ८४ वनडे आणि २० टी२० सामने खेळला आहे. तो सध्या भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार असून तो श्रीलंका संघाविरुद्ध सुरु असलेल्या वनडे मालिकेत व्यस्त आहे.