त्या खेळाडूच्या लग्नातही होते हाताला बँडेज !

इंग्लंडचा स्टार अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सचा शनिवारी विवाह सोहळा पार पडला. त्याच्या पत्नीचे नाव क्लेअर रॅटक्लिफ आहे. या सोहळ्याला त्याच्या संघातील बाकी सहकारी ही उपस्थित होते. इंग्लंडचा स्टार फलंदाज आणि कर्णधार जो रूट व माजी कर्णधार ऍलेस्टर कुक हे दोघेही या सोहळ्यात हजर होते.

वेस्ट ब्रेंट जवळ असलेले सेंट मेरी व्हर्जिन, वेस्टन सुपर मेअर येथे त्यांचा विवाह संपन्न झाला.

बेन स्टोक्स हा पुढील महिन्यात होणाऱ्या ऍशेस मालिकेला मुकणार आहे. याचे कारण म्हणजे ब्रिस्टलमधील हाणामारी प्रकरण. त्या प्रकरण विषयी अजूनही त्याच्यावर चौकशी चालू आहे. त्या हाणामारीत त्याला हाताला दुखापत झाली होती आणि त्याला उजव्या हाताला बँडेज लावावे लागले. लग्नाच्या दिवशीही त्याला ते बँडेज काढता आले नाही.

 

बेन स्टोक्स असा दिसत होता त्याच्या लग्नाच्या दिवशी
बेन स्टोक्सची पत्नी क्लेअर रॅटक्लिफ
इंग्लंडचा कर्णधार जो रूट बेन स्टोक्सच्या लग्नात
इंग्लंचा माझी कर्णधार पॉल पॉल क्वलिंगवूड, वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड आणि फलंदाज ऍलिस्टर कुक

त्याच्या संघ सहकार्यांनी ट्विटरवर आणि इंस्टाग्रामवर फोटोस शेयर करून त्याला शुभेच्या दिल्या.

इंग्लंडच्या माझी कर्णधार पॉल क्वलिंगवूडने त्याचा आणि स्टुअर्ट ब्रॉड चा हा फोटो इन्स्टाग्रामला शेयर केला.

My plus one for the day I think we make a lovely couple @stuartbroad8 ?#wedding #cricket #suit #fashion #sport

A post shared by Paul Collingwood (@paulcollingwood5) on

इयान बेलने स्वतःच्या गर्लफ्रेंड बरोबर ट्विटरवर फोटो शेयर केला.