असे क्रिकेटर जे खेळात आणि अभ्यासात आहेत हुशार…!!

शिक्षणाने चांगला माणूस घडतो असे म्हणतात, तसेच शिक्षणामुळे  माणसाला आपली भाकरी मिळवण्याची समान  संधीही  मिळते. पण, ज्या वेळी एखादा व्यक्ती शिक्षणात आणि खेळात दोन्हीकडे हुशार असतो तेव्हा खरी अडचण येते ती म्हणजे आपले आयुष्य कसे घडवायचे हा निर्णय घेण्यामध्ये. भारतीय क्रिकेटमध्ये आपण सचिनचे उदाहरण नेहमी ऐकतोच की सचिन १०वी  नापास झाला होता आणि आता त्याच्याच  नावाचा धडा १०वी च्या पुस्तकात आहे. पण दर वेळी हे गरजेचं नाही की खेळात करीयर करणारे खेळाडू अभ्य्सात  हुशार नसतातच. पाहुयात काही भारतीय क्रिकेट मधील दिग्गज खेळाडूं जे अभ्य्सात देखील तेवढेच हुशार होते.

 

. रवीचंद्रन अश्विन (इंजिनीअर)

भारताचा सध्याचा सर्वोत्तम कसोटी गोलंदाज व जगातला सर्वोत्तम अष्ठपेल्लू खेळाडू म्हणून जगभर प्रसिद्ध असलेला अश्विनने आपली जादू अभ्यासातही दाखवली आहे. त्याच्याकडे  एस. एस. एन. कॉलेज ऑफ इंजिनीरिंग, चेन्नईची इन्फॉर्मशन अँड टेकनॉलॉजीची पदवी आहे.

 

२. जवागल श्रीनाथ (इंजिनीअर)

कपिल देवचा उत्तराधिकारी म्हणून बघीतल्या जाणारा व त्या काळच्या  सर्वोत्तम वेगवान गोलंदाजानपैकी एक असेलला श्रीनाथ हा देखील या यादीत आहे. श्रीनाथ हा आता पण  एकामेव भारतीय वेगवान गोलंदाज आहे ज्याने एकदिवसीय कारकीर्दीत ३०० बळी घेतले आहेत.  श्रीनाथने ही जे एस एस सायन्स अँड टेकनॉलॉजी युनिव्हर्सिटी, मैसूरमधून इन्स्टुमेंटेशन अँड टेकनॉलॉजिची पदवी घेतली होती.

 

३. अनिल कुंबळे  (इंजिनीअर)

भारताचा प्रशिक्षक आणि भारतीय माजी फिरकी गोलंदाजांच्या यादीत सर्वात वर असणारा अनिल कुंबळे हा देखील एक इंजिनीअर असून त्याने आपली मेकॅनिकलची पदवी राष्ट्रीय विद्यालय कॉलेज ऑफ इंजिनीरिंग बंगलोरमधून घेतली आहे. जगातला एका कसोटीच्या डावात १० गडी बाद करणारा अनिल कुंबळे हा फक्त दुसराच खेळाडू आहे आणि तो इंजिनीअरही आहे हे ऐकून विशेष वाटले ना ?

 

४. राहुल द्रविड (एम.बी.ए.)

भारताचा सर्वोत्तम तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज आणि द वॉल (भिंत) अशी ओळख असलेला राहुल द्रविडकडे संत. जोसेफ कॉलेज ऑफ कॉमर्सची पदवी आहे. त्याला जेव्हा भारतीय संघाकडून खेळण्यासाठी बोलवण्यात आलं तेव्हा तोच याच कॉलेजमधून एमबीएची पदवी घेत होता.

 

५. मुरली विजय (एम.ए.)

आयपीएलचाच प्रॉडक्ट असलेला आणि आता भारताचा कसोटीमधील महत्वाचा खेळाडू मुरली विजयकडे अर्थशास्र विषयाची पदवी असून त्याने तत्त्वज्ञान या विषयात पदवीउत्तर शिक्षण घेतले आहे.