टॉप-५: या क्रिकेटर्सने घेतले लालबागच्या राजाचे दर्शन

मुंबई येथील प्रसिद्ध गणपती लालबागचा राजाचे बॉलीवूड कलाकार आणि खेळाडू दरवर्षी दर्शन घेतात. अगदी पहिल्या दिवसापासून ते बाप्पाच्या दर्शनाला हजेरी लावतात.

यावर्षीही भारतीय क्रिकेट संघातील अनेक आजी माजी खेळाडूंनी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. त्यात भारतीय महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार अंजुम चोप्रा, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, इंग्लंड येथे महिला विश्वचषक अंतिम फेरीत खेळलेली पूनम राऊत आणि वेगवान गोलंदाज धवल कुलकर्णी यांचा समावेश आहे.

या क्रिकेटर्स शिवाय बॉडी बिल्डर संग्राम चौगुले आणि सध्या सुरु असलेल्या प्रो कबड्डीमधील गुजरात फॉर्च्युन जायंट्सच्या संघानेही लालबागच्या राजाचे दर्शन घेतले.

1. सचिन तेंडुलकर

2. पूनम राऊत 

3.धवल कुलकर्णी 

4. अंजुम चोप्रा

5. गुजरात फॉर्च्युन जायंट्स